सगळ्यांसाठी लोकल ट्रेन कधी सुरू होणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले उत्तर

तुषार सोनवणे
Wednesday, 21 October 2020

मुंबईकरांच्या मागणीला प्रतिसाद देत मंत्री विजय वडेट्टीवरांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे कधीही न थांबनारी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन सुद्धा बंद झाली. आता हळू हळू लॉकडाऊन शिथिल होत असताना, सर्वसामन्यांसाठी लोकल कधी सुरू होणार हा प्रश्न सर्वच मुंबईकरांना पडला आहे. यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे

NCP मधील एक मंत्री खडसेंसाठी पद सोडणार ? नाथाभाऊंना कोणतं पद किंवा खातं ? चर्चा तर होणारच !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ लॉकडाऊननंतर, मिशन बिगीन अगेनची घोषणा केली. तेव्हापासून राज्यात हळुहळु व्यवहार सुरळीत होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा देण्यात आली होती. आता महामुंबईतील सर्वच महिलांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांसाठीच लोकल कधी सुरू होईल याबाबत, मुंबईकर सवाल करीत आहेत. लवकरात लवकर लोकल सुरू करण्यात यावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत.

लोकल सुरु झाल्याने वसई विरारच्या महिला प्रवाशांमध्ये उत्साह; वेळेत बदल करण्याची मागणी

मुंबईकरांच्या मागणीला प्रतिसाद देत मंत्री विजय वडेट्टीवरांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याबाबचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांत होणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गेल्या 6 महिण्यांपेक्षा अधिक काळापासून कामावर न जाता आलेल्या मुंबईकर चाकमान्यांना दिलासा मिळणार आहे. लोकल प्रवास सर्वांसाठीच खुला करण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनामध्ये महत्वपुर्ण बैठक झाली असून त्यात सर्वांना लोकल प्रवास खुला करण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the local train for all start Minister Vijay Vadettiwar replied