गोंधळात गोंधळ! आता या मनोरुग्णाकडे कुठून आला पीपीई किट? रस्त्यावर मुक्त वावर...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जुलै 2020

वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

विरार (बातमीदार) : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात सर्वच जण हैराण आहेत. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी देशासह आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....

विरार परिसरात पीपीई किट घालून एक मनोरुग्ण खुलेआम रस्त्यावर फिरताना समोर आला आहे. रविवारी (ता. 5) दिवसभर विरार पूर्व परिसरात हा मनोरुग्ण फिरत असताना त्याचा एका जागरुक नागरिकाने व्हिडिओ काढून व्हायरल केला. या प्रकाराने महापालिकेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे पीपीई किट या मनोरुग्णाकडे आले कुठून? हे कुठे वापरले गेले होते? आदी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: where did this psychiatrist get the PPE kit? Free walk on the street ...