Mumbai Crime News : 'त्या' सहा तासात नेमकं घडलं काय? घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागील गूढ वाढलं

Where was Ghatkopar couple for six hours couple found dead in bathroom after playing holi in ghatkopar
Where was Ghatkopar couple for six hours couple found dead in bathroom after playing holi in ghatkopar

मुंबई : घाटकोपर (पूर्व) येथील त्यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये बुधवार, 8 मार्च रोजी चाळीशीतील एक जोडपे मृतावस्थेत आढळले होते. या जोडप्याच्या मृतदेहावर बाह्य जखमांच्या खुणा आढळल्या नव्हत्या. पोस्टमार्टमनंतर देखील मृत्यूच्या कारणांचा खुलासा होऊ शकलेला नाहीये. यादरम्यान या जोडप्याच्या मृत्यूबद्दल गूढ आणखी वाढलं आहे.

घाटकोपरच्या एका आलिशान सोसायटीत बुधवारी सापडलेल्या या जोडप्याच्या मृत्यूचा तपास पंतनगर पोलिस करत आहेत. या दपासादरम्यान एक विचित्र बाब समोर आली आहे.

मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास चेड्डा नगर जंक्शन (घरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर) या जोडपे दिसून आले होते. परंतु त्यानंतर रात्री 9.30 पर्यंत त्यांचा कुठलाही ठावठिकाणा समजलेला नाही. या सह तासांच्या कालावधीत हे जोडपे नेमके कुठे होते हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याचाच शोध घेण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यामुळे या गूढ मृत्यूवर प्रकाश पडू शकेल. या प्रकरणात पोस्टमॉर्टेमनंतर देखील डॉक्टरांनी मृत्यूचे कारण सांगू शकलेले नाहीयेत.

Where was Ghatkopar couple for six hours couple found dead in bathroom after playing holi in ghatkopar
Pune News : डीजेचा दणदणाट, वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकाने फोडली १० लाखांची साऊंड सिस्टीम

बुधवारी दुपारी 12.15 च्या सुमारास, घाटकोपर पूर्व येथील कुकरेजा पॅलेस या आलिशान इमारतीतून पंत नगर पोलिसांना फोन आला की, फ्लॅटमधील बाथरूममध्ये एक जोडपे निश्चल अवस्थेत पडलेले आढळले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले आणि त्यांना 45 वर्षीय दीपक शहा आणि त्यांची 39 वर्षीय पत्नी टीना नग्नावस्थेत पडलेले आढळले.

घाटकोपर (पूर्व) येथील पंतनगर भागातील कुकरेजा पॅलेसमध्ये राहणारे दीपक शहा (44) आणि टीना शहा (39) अशी मृतांची नावे आहेत. दीपक कपड्यांचा व्यवसाय करत. मंगळवारी या जोडप्याने शेजारी आणि कुटुंबीयांसह होळीही साजरी केली. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सेलिब्रेशन करून ते घरी गेले होते.

Where was Ghatkopar couple for six hours couple found dead in bathroom after playing holi in ghatkopar
Manusmriti Video : ती मनुस्मृती पेटवून त्यावर कोंबडी शिजवणारी तरूणी नेमकी आहे तरी कोण?

ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली असता नातेवाईकांनी शहा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दाम्पत्याच्या घरी जाऊन त्यांच्याकडे असलेल्या चावीने घर उघडले. दाम्पत्य बाथरूममध्ये पडलेले पाहून कुटुंबीयांना धक्का बसला. यानंतर त्यांनी पंतनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. शहा दाम्पत्याला तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या जोडप्याला मूलबाळ नव्हते आणि त्या दोघांशिवाय घरात कोणीही राहत नव्हते. अंघोळ करताना मृत्यू झाल्याचा कयास वर्तवला जात आहे. व या जोडप्या्चया शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. त्यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com