राज्यपालांना पाठवलेल्या यादीत कोणत्या उमेदवारांची नावे? राजकिय वर्तुळात तर्कवितर्क

तुषार सोनवणे
Friday, 6 November 2020

राज्यपाल भगतसिंंह कोशारी यांच्याकडे सुपूर्द केली.या यादीत नेमकी कोणाची नावे असणार आहेत. तसेच राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष आहे. 

मुंबई - विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. त्याजागी नव्या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने उमेदवारांची यादी आज राज्यपाल भगतसिंंह कोशारी यांच्याकडे सुपूर्द केली.या यादीत नेमकी कोणाची नावे असणार आहेत. तसेच राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष आहे. 

शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, कॉंग्रसनेते अमित देशमुख या मंत्रिमंडळाच्या गटाने आज राज्यपाल महोदयांची भेट घेतली. त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीत तिन्ही पक्षाच्या 4-4 उमेदवारांची नावे असल्याचे कळते आहे. या यादीत नेमके कोणाची नावे आहेत. याबाबत राजकिय चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे या यादीतील संभाव्य नावे 'सकाळ'च्या सुत्रांनी दिली आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीची यादी सुपूर्द; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

राष्ट्रवादी पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी

 • एकनाथ खडसे
 • राजू शेट्टी
 • यशपाल भिंगे
 • आनंद शिंदे

कॉंग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी 

 • रजनीताई पाटील
 • सचिन सावंत
 • मुझफ्फर हुसैन
 • अनिरुद्ध बनकर

शिवसेना पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी

 • उर्मिला मातोंडकर
 • नितीन बानुगडे पाटील
 • चंद्रकांत रघुवंशी
 • विजय करंजकर

राज्यापालांना उमेदवारांची यादी दिल्यानंतर आता त्यावर राज्यपाल कधी निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which candidates are on the list sent to the Governor for governor appointed MLAs