दबंगगिरी करत गेले मोबाईल शोधायला, ट्रेन आली आणि संकेतला घेऊन गेली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

नवी मुंबई - मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेन्स. ट्रेनमधून प्रवास करताना आपल्या स्वतःची आणि वस्तूंची काळजी घ्या असं वारंवार सांगितलं जातं. मात्र याला फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. याचाच फटका अनेकांना वारंवार बसतो. याबद्दल आपण बातम्या देखील पाहतो, वाचतो, तरीही पालथ्या घड्यावर पाणी. असाच आणखी एक प्रकार नवी मुंबईच्या वाशी खाडी पुलाजवळ घडलाय.    

महत्त्वाची बातमी - मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे

रेल्वेरूळावर पडलेला मित्राचा मोबाईल शोधत असताना रेल्वेची धडक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. याच घटनेत दुसरा तरुण जखमी झाला आहे. वाशी मानखुर्द स्थानकांदरम्यान वाशी खाडी पुलाजवळ बुधवारी (ता. 4) हा अपघात घडला. या प्रकरणाची वाशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी - आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...

संकेत जाधव असे मृत तरुणाचे नाव असून तो मानखुर्द येथील रहिवासी आहे. तो आपल्या अन्य दोन मित्रांसह वाशीकडून मानखुर्दकडे जात असताना खाडीपुलालगत त्याच्या मित्राच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो शोधण्यासाठी तिघे मित्र रेल्वेरूळावरून चालत खाडीपुलाजवळ गेले. या वेळी पाठीमागून येणाऱ्या रेल्वेचा अंदाज न आल्याने त्यातील दोघांना धडक बसली, त्यात संकेत याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.

while searching his friends mobile phone on railway track sanket lost his life   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: while searching his friends mobile phone on railway track sanket lost his life