esakal | PPE किट घातल्याने सहा सहा तास पाणीही पिता येत नाहीत हो, घामाची अंघोळ होते; वाचा कोरोना वॉरियर्स कसे काम करतायत..
sakal

बोलून बातमी शोधा

 PPE किट घातल्याने सहा सहा तास पाणीही पिता येत नाहीत हो, घामाची अंघोळ होते; वाचा कोरोना वॉरियर्स कसे काम करतायत..

पीपीई किट्स मध्ये होतेय डॉक्टरांची घुसमट; वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाची आंघोळ 

PPE किट घातल्याने सहा सहा तास पाणीही पिता येत नाहीत हो, घामाची अंघोळ होते; वाचा कोरोना वॉरियर्स कसे काम करतायत..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - दिवसभर कामाचा ताण, सतत कोरोनाचे रुग्ण, मनात भीती, अंगावर कामाच्या अनेक तासात घातलेला पीपीई किट्स आणि त्यातून निघणारा सतत घाम. तरीही 12 तास त्याच पीपीई किटमध्ये राहून कोरोना रुग्णांची सेवा. हे वाचायला जरी भीषण वाटत असले तरी ही सत्य परिस्थिती आहे पालिका आणि सरकारी रुग्णालयात कोरोनासाठी झटत असणाऱ्या वॉरियर्सची.

सध्या हे वॉरियर्स डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पीपीई किट्सने झाकले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई किट्स डॉक्टरांना देण्यात आले आहेत. पण, या किट्स मुळे डॉक्टरांची घुसमट होत आहे. शिवाय, दिवसाच्या अनेक तास हे किट्स घातल्याने नैसर्गिक विधी करण्यासाठी ही त्रास होतो. सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे वय 24 ते 30 मधील आहे. मात्र, वयस्कर डॉक्टर आणि स्टाफ परिचारिका, वॉर्डबॉय यांची अवस्था त्याहीपेक्षा वाईट होत असल्याचे कोरोना वॉर्डात काम करणारे डॉक्टर सांगतात. 

मेल्यानंतरही सोसाव्या लागतायत मरणयातना; कूपर रुग्णालयातील डोळ्यात पाणी आणणारा प्रकार...

गेल्या काही दिवसांपासून एका भयंकर शारीरिक आणि मानसिक विवंचनेतून या डॉक्टरांना जावं लागत असल्याचं केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर डॉ. दीपक मुंढे सांगतात. 

6 ते 7 पाण्याचे सेवन ही करता येत नाही - 

डॉ. दिपक मूंढे यांनी केईएम, कस्तुरबा, सेवन हिल्स, नायर रुग्णालय या ठिकाणी कोरोना वॉर्डात काम केले. दिवसा सहा-आठ तास तर रात्री 12 तासांच्या शिफ्टमध्ये हे डॉक्टर काम करत आहेत. या आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. यात पीपीई किट परिधान करुन काम तरणे आव्हानात्मक आहे. हा किट घालताना आणि काढताना सुरक्षेचे नियम पाळणे बंधनकारक आहे. मात्र पीपीई घातल्यानंतर सहा-सात तास पाणी सुद्धा पिता येत नसल्याचे डॉ. मुंढे सांगतात. 

मोठी बातमी - ऐन लॉक डाऊनमध्ये आता पोलिसांच्या बदल्या... 

उष्णता काढतोय घामटा - 

सध्याची उष्णता वाढत असून वॉर्डांमधील एसी देखील बंद आहे. त्यामुळे, डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने भिजायला होते. चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर 3 Ply सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे नीट श्वासही घेता येत नाही, गुदमरल्यासारखे होते. त्यामुळे, थकवा डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवत आहेत. श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुकं जमा होतं म्हणून समोर पाहणेही अंधुक होते. याही परिस्थितीत सतत अलर्ट राहून येणाऱ्या प्रत्येक पेशंटला संभाव्य धोका समजून त्यावर दिलेल्या नियमावलीप्रमाणे उपचार करण्याचा निर्णय त्वरीत घ्यावा लागतो. 

3 मे नंतर लॉक डाऊन उठला तरीही पाळावेच लागतील 'हे' नियम, कारण कोरोनाची टांगती तलावर डोक्यावर असेल

कित्येक रुग्ण केवळ घाबरल्यामुळे डॉक्टरांकडे धाव घेतात. त्यांना हे सगळं समजून सांगणे आव्हानाचे काम आहे. किटमधून त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. ओरडून ओरडून बोललं तरच आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ओरडल्यामुळे घसा पार कोरडा होतो. पण पाणी पिण्याची सोय नाही म्हणून हा तोंड दाबून बुक्क्याचा मार असहाय्यतेच्याही पलिकडे जातो. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या काही मित्रांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, इतर अनेक रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचा-यांना संसर्ग झाल्याचे आकडे वाढत आहेत.' - डॉ. दीपक मुंढे, निवासी‌ डॉक्टर, केईएम रुग्णालय. 

while working in PPE kit is toughest task done by doctors read full hearth touching story 


 

loading image