ठाण्यातील रस्त्याचे रुंदीकरण कोणाच्या फायद्यासाठी? भाजप नगरसेवकांचा सवाल

ठाण्यातील रस्त्याचे रुंदीकरण कोणाच्या फायद्यासाठी? भाजप नगरसेवकांचा सवाल

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रस्तावानुसार शहरातील रुंदीकरणाबाबत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अधिसूचनेत 34 रस्त्यांपैकी दोन रस्त्यांची रुंदी बारा मीटर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अधिसूचनेतील अनुक्रमांक तेहतीस सरस्वती शाळा ते दया क्षमा शांती इमारत ते सेवा रस्ता असा प्रस्तावित रस्ता 12 मीटर रुंद करण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे हा रस्ता कोणाच्या सोयीसाठी अधिक रुंद केला  असा सवाल भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी केला आहे. 

ठाण्यातील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या पार्श्‍वभूमीवर जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हे मुद्दे उपस्थित केले आहेत. हा रस्ता 12 मीटर रुंद करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनावर कुणाचा दबाव होता? या रस्त्याच्या 12 मीटरच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यासाठी ठाणेकरांना वेठीस धरले होते का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. याच रस्त्यावर एका मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचा पुनर्विकास सुरू आहे. या पुनर्विकासाला ठाण्यातील सत्तारूढ पक्षाच्या एक ज्येष्ठ नगरसेवकाचे आपल्या पदाचा वापर करून संबंधित नगरसेवकाने ही 12 मीटरची किमया घडवून आणली का? आपले हित बघताना ठाणेकरांचे व्यापक हित लक्षात घेऊन पुढील काळात पुनर्विकासासाठी ठाण्याच्या अन्य रस्त्यांची रुंदी नऊ मीटरपेक्षा अधिक वाढविण्याची गरज असल्यास हीच तत्परता दाखवणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. 
 

Who benefits from widening of Thane road? Question of BJP corporators
---------------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com