NCP leader Nitin Deshmukh seen being supported by party workers after the alleged assault inside the Maharashtra Assembly. The incident has escalated BJP-NCP tensionsesakal
मुंबई
Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?
Who is Nitin Deshmukh| Political Background and Role in Maharashtra Assembly Clash : विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वादात नितीन देशमुखांना मारहाण. कोण आहेत हे देशमुख? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सविस्तर.
महाराष्ट्र विधानसभेत गुरुवारी रात्री एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शिवीगाळाचा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या घटनेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केल्याने वाद आणखी चिघळला आहे.