तारापूरमधील कंपन्यांच्या स्फोटांना जबाबदार कोण? कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष 

तारापूरमधील कंपन्यांच्या स्फोटांना जबाबदार कोण? कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष 
Updated on


विरार  ः सोमवारी झालेल्या स्फोटाने तारापूर आणि बोईसर परिसरात असलेल्या कंपन्यांच्या सुरक्षिततेला मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपनीत होणाऱ्या स्फोटांना जबाबदार कोण ? असा प्रश्‍न देखील या निमित्ताने उपस्थित होतो आहे. पाच महिन्यात या ठिकाणी दोन मोठे स्फोट झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 16 जण जखमी झाले आहेत. 

- आणखी एक मृत्यदेह मिळाला 
सोमवारी झालेल्या स्फोटात नंदोलिया ऑरगॅनिक केमिकल्स कंपनीत झालेल्या स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते.तसेच एक जण बेपत्ता होता. आज बेपत्ता असणाऱ्या ब्रिजेश कुमार कुशवाह याचा मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे स्फोटात मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. 


- इन्फेक्‍शनकडे दुर्लक्ष 
या भागात असलेल्या कंपन्यांची सुरक्षितता बघण्याचे काम फॅक्‍टरी इन्स्पेक्‍टर करतात. परंतु नुकत्याचा झालेल्या स्फोटाने हे इन्स्पेक्‍टर खरेच इन्स्पेक्‍शन करतात का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार येथील कारखान्याची तपासणी वेळच्या वेळी होत नाही. पालघर जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार कारखाने आहेत. मात्र फॅक्‍टरी इन्स्पेक्‍टर फक्त चारच आहेत. हे इन्फेक्‍टर वर्षभर कंपनीच्या तपासणीसाठी जातच नसल्याचे बोलले जात आहे.

 - रासायनिक कंपन्यांना सर्वाधिक धोका 
दोन वर्षात या भागात झालेल्या स्फोटात रासायनिक कंपन्यामध्ये झालेल्या स्फोटाची संख्या जास्त आहे. याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालयचे सह संचालक अशोक खोत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. त्यांच्या वसई येथील कार्यालयाचा फोन ही नादुरुस्त असल्याचे समजते. 

गेल्या दोन वर्षात झालेले अपघात 
- 8 मार्च 2018- ई प्लॅन्टमध्ये असलेल्या नोवा फेम स्पेशालिटी कंपनीमध्ये भयानक स्फोट होऊन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर 13 जण जखमी 

- 8 सप्टेंबर 2018 - यूपीएललि या कंपनीला ब्रोमीन या रसायनांच्या गळतीमुळे झालेल्या अपघातात चार कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका कामगारांचा मृत्यू झाला होता.

- 12 ऑक्‍टोबर 2018 - टी झोन मधील लुपिन लि. कंपनी समोर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे शेकडो चिमण्यांचा मृत्यू झाला. 

- 20 जानेवारी 2019 - रामदेव केमिकल्स या कंपनीतील स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू झाला. 

- 27 जानेवारी 2019 - साळवी केमिकल्समध्ये पेटते सॉल्व्हट अंगावर पडल्याने 1 गंभीर व 6 कामगार जखमी झाले.

- मार्च, एप्रिल व मे महिन्यात अनुक्रमे मे के.सी. काटा, मंधना व डी. सी टेक्‍स या कंपन्यामध्ये प्रत्येकी एक असा कामगाराचा मृत्यू झालेला आहे. 

- 4 मे 2019 - रोजी बजाज हेल्थकेअर, युनियन पार्क केमिकल, नोवासन केमिकल कारखान्यात तर 14 मे 2019 रोजी आरती ड्रग्ज या कारखान्यांमध्ये झालेल्या वायूगळतीत जवळपास 45 कामगारांना बाधा झाली होती. 

- 12 मे 2019 - स्क्वेअर केमिकल या कंपनीत वायुगळती होऊन कारखाना व्यवस्थापकासह तीन कामगारांचा बळी गेला. या कामगारांवर उपचार करत असलेल्या डॉक्‍टरांनाही या विषारी वायूची बाधा झाली होती. 

- 24 मे 2019- करीगो ऑगॅनिक्‍स या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट होऊन 5 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला. 

- 30 ऑगस्ट 2019- औषध निर्मिती करणाऱ्या एसएनए हेल्थकेअर या कारखान्यात वायुगळती होऊन सुपरवायझरचा मृत्यू झाला. 

- एप्रिल 2020 - गॅलॅक्‍सि कंपनीत झालेल्या स्फोटात 2 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला होता. 

==============

- 160 कोटीचा दंड 
तारापूर मधील कंपन्यांना हरित लवादाने नेमलेल्या समितीने प्रदूषणासाठी 102 कंपन्यांना 160 कोटींचा दंड ठोठावला. यामध्ये सर्वाधिक दंड आरती ड्रग्स, मोल्ट्‌स रिसर्च लॅबरोटरी या कारखान्यांना ठोठवण्यात आला.
--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com