esakal | कोरोनाविरोधात अख्खे कुटुंबच मैदानात 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाविरोधात मैदानात उतरलेले जोशी कुटुंबीय

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांची सेवा करण्याचे कर्तव्य हे कुटुंब पार पाडत आहे. पती, पत्नी व दोन मुली असे हे चौकोनी कुटुंब आहे. कुटुंबप्रमुख सखाराम जोशी पालिकेच्या सेवेतून 2014 ला निवृत्त झाले. ते मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांची पत्नी अमिता जोशी गोवंडीच्या बैंगनवाडी येथील; तर मोठी मुलगी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. धाकटी मुलगी विशाखा वरळी येथील पोद्दार रुग्णालयात सेवा देत आहे. 

कोरोनाविरोधात अख्खे कुटुंबच मैदानात 

sakal_logo
By
रशिद इनामदार

मानखुर्द (मुंबई) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस तसेच आरोग्य कर्मचारी स्वतःच्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी गोवंडीच्या देवनार पालिका वसाहतीतील जोशी कुटुंबही तेवढ्याच धैर्याने ही लढाई लढत आहेत. या कुटुंबातील माता व दोन लेकी वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णसेवेत व्यस्त आहेत. 

वाचा सविस्तर : वरळीनंतर मुंबईतील 'या' भागात सापडताहेत कोरोना रुग्ण

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांची सेवा करण्याचे कर्तव्य हे कुटुंब पार पाडत आहे. पती, पत्नी व दोन मुली असे हे चौकोनी कुटुंब आहे. कुटुंबप्रमुख सखाराम जोशी पालिकेच्या सेवेतून 2014 ला निवृत्त झाले. ते मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांची पत्नी अमिता जोशी गोवंडीच्या बैंगनवाडी येथील; तर मोठी मुलगी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत. धाकटी मुलगी विशाखा वरळी येथील पोद्दार रुग्णालयात सेवा देत आहे. 

क्लिक करा : धक्कादायक! लॉकडाऊन वाढल्याची घोषणा ऐकून पुजाऱ्याची आत्महत्या

मानखुर्द-गोवंडीच्या दाट झोपडपट्टीच्या परिसरात रुग्णसेवा देणे आव्हानात्मक आहे. तरीही, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पालिकेकडून येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करत तिघी मायलेकी आपले कर्तव्य बजावत आहेत. पोद्दार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांची काळजी लहान मुलगी घेत आहे. एकंदरीतच कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोशी कुटुंब रुग्णसेवेत रंगल्याचे दिसत आहे. 

तिघींचा सार्थ अभिमान... 
सखाराम जोशी हे मधुमेहाचे रुग्ण असल्यामुळे स्वतःची काळजी घेत त्यांनी आपला दिनक्रम तिघींच्या दिनक्रमाला साजेसा केला आहे. कोरोनाशी दोन हात करून तिघी रुग्णसेवा करत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

loading image