वसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ

अच्युत पाटील
मंगळवार, 15 जानेवारी 2019

बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठे प्रमाणेच मुंबई अहमदाबाद महामार्गावर उत्तर मुंबईच्या प्रवेश द्वारावर फळे, भाजीपाला विक्रिसाठी घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात यावी अशी मागणी मागच्या पंचवीस वर्षे पालघर जिल्ह्यातील शेतकरी करित आहेत. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा आमदार हितेंद्र ठाकुर करीत आहेत. 

मात्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीचा कधीही विचार केला नाही. किंबहुना विरोधी पक्षात असताना केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता स्थापन झाल्यास प्राधान्याने या मागणीचा विचार करु असे जाहिर सभेत आश्वसन देणाऱ्या राम नाईकांनाही विसर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती.

मुंबईतील घाऊक बाजारपेठा नवीन मुंबईत हलवल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल फळे, भाजीपाला विक्रिसाठी द्राविडी प्राणायम करावा लागत आहे. नवी म़ुबई पर्यतचा प्रवास वाढल्याने वाहतुक खर्च वाढल्याने तसेच शेतमालाला शास्वत बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

मुंबईचा वाढता विस्तार आणि वसई- विरार भागात विकसित होत असलेल्या तिसऱ्या मुंबईचा विचार करून बाजार पेठेचे विकेंद्रीकरण करावे अशी मागणी सातत्याने केली जात असे.दरम्याच्या काळात शासनाने शहरात शेतमाल विक्रिसाठी शेतकऱ्याला सवलत दिली असली तरी त्याचा फायदा झाला नाही.

लवकरात लवकर बाजारपेठ उपलब्ध झाल्यास बळिराजाचा आत्मविश्वास वाढेल असे मत चिंचणी-वाणगाव भाजीपाला उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चुरी व महाराष्ट्र राज्य चिकु उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Wholesale Market in Vasai-Virar Municipal Region soon