esakal | अजितदादा म्हणतात No Comments, बंद खोलीत झालं तरी काय ?
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादा म्हणतात No Comments, बंद खोलीत झालं तरी काय ?

पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुढील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समन्वय समितीची बैठक कधी होईल याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिलीये.

अजितदादा म्हणतात No Comments, बंद खोलीत झालं तरी काय ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील नाटकीय घडामोडी थांबण्याचं नाव नाही. अशात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात समन्वय समितीची बैठक पार पडणार होती. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत चर्चा सुरु असताना अजित पवार हे बैठक सोडून बारामतीकडे निघालेत. 

पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी पुढील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस समन्वय समितीची बैठक कधी होईल याबाबत काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिलीये. पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी 'No Comments' या व्यतिरिक्त काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी आहे का ? किंवा राष्ट्रवादी पक्षात पदांच्या वाटपावरून काही कलह आहे का? असे प्रश्न अनेकांच्या मनात येतायत.    

सकाळपासूनच आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आज बैठक होणार होती अशी माहिती समोर येत होती. दरम्यान बैठकीबाबत कोणत्याच प्रकारची माहिती ना राष्ट्रवादी कडून समोर येतेय, ना कॉंग्रेस कडून. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसवर यानिमित्ताने समन्वय नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांनी दोन्ही कॉंग्रेसमध्ये समन्वय असल्याचं म्हटलंय. याच बाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही असंच उत्तर दिलंय. 

आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची बैठक कधी आणि कुठे होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

Webtitle : why did ajit pawar went to baramati