esakal | ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर महाराष्ट्राला कमी पाडला जातोय? - संजय राऊत

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्यांमुळे रुग्णसंख्या जास्त आहे. देशातील अन्य राज्यात कोरोना चाचण्या तितक्या प्रमाणात होत नाहीत त्यामुळे तिथे रुग्णसंख्या कमी आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात ही आमची मागणी आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान म्हणतात, महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर कमी पडणार नाही. मग ही औषधे महाराष्ट्राला का कमी पाडली जात आहेत?. लोकांच्या जीवाशी का खेळताय?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

"ऑक्सिजन बाबत केंद्राने गांभीर्याने विचार करावा. उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतोय. गुजरात, उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायालयाने लॉकडाउन करण्याचा आदेश दिला. मग तिथले मुख्यमंत्री का वेळ लावत आहेत?. लोकांच्या जीवाशी का खेळताय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. देशाची परिस्थिती हातघाईला आलीय. नियंत्रणाबाहेर परिस्थिती आहे."

"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. ब्रेक द चेन साठी कडक लॉकडाउन लावावा अशी सरकारमधील मंत्र्यांची मागणी होती. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिव्हीरचे वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिव्हीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा" अशी मागणी राऊत यांनी केली.