esakal | इमारत पाडकामाचा खर्च डेव्हलपरकडून वसूल करणार; उल्हासनगर पालिकेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत पाडकामाचा खर्च डेव्हलपरकडून वसूल करणार; उल्हासनगर पालिकेचा इशारा

रस्त्यावर कोसळून जीवितहानी होण्याच्या शक्‍यतेने उल्हासनगर महापालिकेच्या वतीने रिक्त असलेल्या अतिधोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे

इमारत पाडकामाचा खर्च डेव्हलपरकडून वसूल करणार; उल्हासनगर पालिकेचा इशारा

sakal_logo
By
दिनेश गोगी


उल्हासनगर ः रस्त्यावर कोसळून जीवितहानी होण्याच्या शक्‍यतेने उल्हासनगर महापालिकेच्या वतीने रिक्त असलेल्या अतिधोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. या पाडकामासाठी लाखो रुपये खर्च अपेक्षित असून, पालिका ही रक्कम विकसकाकडून वसूल करणार आहे. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी ही माहिती दिली. 

नवी मुंबई आयुक्त निवासाला आग! शॉकसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज -

उल्हासनगरात 30 अतिधोकादायक इमारती पालिकेने खाली केल्या आहेत. त्यात कुणीही वास्तव्यास नसून त्या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने आणि कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. इमारती विकसकाने स्वतः पाडाव्यात; अन्यथा पालिकेच्या वतीने पाडण्यात आल्या तर त्या बदल्यात पालिकेला रक्कम अदा करावी लागेल, अशा नोटिसा विकसकाला बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नंबर दोनमध्ये माजी नगरसेवक गिधू सचदेव यांच्या बाजूला असलेली साई कुटीर ही इमारत स्वतः सदनिकाधारकांनी पाडली आहे. 

उर्वरित विकसक किंबहुना सदनिकाधारक पुढे येत नसल्याने आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशानुसार उपायुक्त मुख्यालय मदन सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजय एडके, भगवान कुमावत यांनी पोलिस बंदोबस्तात कॅम्प नंबर एकमधील झुलेलाल मंदिराजवळील हमलोग अपार्टमेंट, कॅम्प नंबर दोन येथील यात्री निवासच्या मागील शांती पॅलेस अपार्टमेंट व कॅम्प चार व्हिनस लालचक्की रोडवरील ओम शिवगंगा अपार्टमेंट पाडण्यास सुरुवात केली आहे. या इमारतींच्या पाडकामानंतर बाकी इमारतींकडे मोर्चा वळवण्यात येणार आहे. 
- गणेश शिंपी,
सहायक आयुक्त 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image