काँग्रेस प्रणीत इंटक मंत्रालयावर धडकणार? महाविकासआघाडी विरोधातच पुकारणार एल्गार

प्रशांत कांबळे
Tuesday, 22 December 2020

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस प्रणीत कामगार क्षेत्रातील इंटक संघटनेला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस प्रणीत कामगार क्षेत्रातील इंटक संघटनेला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडूनही याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याने काँग्रेसची कामगार चळवळीचं संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच आघाडी सरकारमधील मंडळ महामंडळातील समित्यांवर नियुक्ती करण्यासाठी पत्र दिले असूनही त्याचा विचार केला जात नसल्याने अखेर मंत्रालयावर महाविकास आघाडीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज्याचे इंटक अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितले आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेची मंगळवारी (ता.22) रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन बैठक पार पडली आहे. यामध्ये राज्यातील इंटक संलग्नित सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये केंद्राच्या कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये, कामगार क्षेत्रातील सर्व मंडळ महामंडळ व समित्यांवर इंटकला प्रतिनिधित्व देण्यात यावे, पुणे माथाडी कामगार मंडळाची बोर्डावर इंटकला प्रतिनीधित्व न दिल्याने खेद व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या शपथ नाम्याची अंमलबजावणी करावी, महाविकास आघाडी सरकारच्या किमान - समान कार्यक्रमात कामगार क्षेत्राचा अंतर्भाव करावा या विषयांवर ठराव करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या कामगार क्षेत्रातील विविध समित्या, मंडळ,महामंडळ आहेत. मात्र, यावर काँग्रेस पक्षाच्या कामगार क्षेत्रातील इंटकला  प्रतिनिधित्व दिले नाही. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अनेकदा पत्र पाठवूनही त्याची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये इंटकची कामगार चळवळ संपवण्याकरिता घाट घातल्या जात असल्याचा आरोप सुद्धा छाजेड यांनी केला आहे.

काँग्रेस इंटकचा स्वतंत्र काळातील इतिहास
महात्मा गांधी यांनी राजकारण विरहित कामगार चळवळीला न्याय देण्यासाठी स्वतंत्र संघटना निर्माण करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल याना सांगितले होते. त्यावरून 3 मे 1947 रोजी इंटकची स्थापना करण्यात आली. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यानंतर सरकारमध्ये कामगारांच्या न्याय हक्कांसाठी प्रतिनिधित्व सुद्धा दिले, मात्र आता काँग्रेसच्या राजकारण विरहित कामगार चळवळीला पक्षातूनच सहकार्य केले जात नसल्याचा आरोप करण्याची वेळ आली आहे.

 

महाविकास आघाडीच्या किमान-समान कार्यक्रमामध्ये कामगार क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात येणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणुकीपूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या शपथनाम्यात सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आता आघाडी सरकारच्या किमान - समान कार्यक्रमात कामगार चळवळीला प्रतिनिधित्व देत नसून, काँग्रेस पक्षाच्या प्रणित इंटक संघटनेला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे संतप्त इंटक संघटनेकडून आघाडी सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार 
- जयप्रकाश छाजेड,
अध्यक्ष, महाराष्ट्र इंटक

Will Congress led Intac on mantralaya call against Mahavikasaghadi

-----------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Congress led Intac on mantralaya call against Mahavikasaghadi