मुंबईत लहान मुलांना लस नाही? BMC ने दिली महत्वपूर्ण माहिती

समीर सुर्वे
Wednesday, 13 January 2021

कोव्हिड लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत कोव्हिडसंदर्भात काम केलेल्यांना लस मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी रुग्णांना लस मिळणार आहे

मुंबई : कोव्हिड लसीकरणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत कोव्हिडसंदर्भात काम केलेल्यांना लस मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी रुग्णांना लस मिळणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी बुधवारी दिली. त्यामुळे पुढील वर्षभर तरी लहान मुलांना लस मिळण्याची शक्‍यता कमी आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीच्या एक लाख 39 हजार 500 मात्रा (डोस) मुंबईत दाखल झाल्या आहेत. या मात्रा परळ येथील एफ दक्षिण प्रभाग कार्यालयातील शीतगृहात ठेवण्यात आल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया रविवार (ता. 16) पासून सुरू होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी परळ येथील लस साठवणूक केंद्राचा आढावा घेतला. लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात अनेक शंका आहेत; मात्र त्या दूर करून नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही महापौरांनी केले.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाची तयारी महानगरपालिकेने केली आहे. पाच टप्प्यांत प्रक्रिया पार पडणार आहे. 15 लसीकरण केद्रांपैकी नऊ ठिकाणी तिची रंगीत तालीम झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पहिल्या फळीतील कर्मचारी आणि तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील नागरिकांसह सहव्याधी व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. 

 Will Mumbai children also get corona vaccinated? Important information provided by BMC

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Mumbai children also get corona vaccinated? Important information provided by BMC