हिवाळ्यातील वायू प्रदूषणामुळे 'इन्फ्लुएन्झा'चा धोका वाढला; मुलांसह वयोवृद्धांनी घ्यावी काळजी

हिवाळ्यातील वायू प्रदूषणामुळे 'इन्फ्लुएन्झा'चा धोका वाढला; मुलांसह वयोवृद्धांनी घ्यावी काळजी

मुंबई : हवामानातील तीव्र बदल आणि हवेचा खालावत जाणारा दर्जा यामुळे मुंबईत गेल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या तुलनेत यावर्षीच्या हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला आहे. श्वसनमार्गाच्या वरील भागाला होणा-या संसर्गामध्ये 20% वाढ झाली असून अनेकांना रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध तसेच ‘हाय रिस्क’ गटांतील व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

सध्या सुरू असलेला शिंका आणि खोकल्याचा मोसम वाढत्या वायू प्रदूषणामुळे अधिकच त्रासदायक बनला आहे. त्यातून मोसमी इन्फ्लुएन्झाविषयीच्या चिंतेमध्येही अधिकच भर पडली आहे. थंड हवेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते तसेच त्यातील आद्रतेचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे इन्फ्लुएन्झाच्या विषाणूंच्या संसर्गाचा धोका वाढतो. त्यात कोव्हिडचा धोका थोडाही कायम असल्याने मोसमी इन्फ्लुएन्झापासून संरक्षण मिळवणे महत्त्वाचे बनले असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.  
“हिवाळ्यात अस्थमा, सीओपीडी यांसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व्यक्ती किंवा रोगप्रतिकारशक्ती खालावलेल्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक असतो. सध्या सुरू असेलेले पॅनडेमिक आणि सणासुदीचे वातावरणामुळे इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांच्या संख्येत 20% वाढ झाली आहे. रूग्णालयात दाखल होणा-या रूग्णांच्या  संख्येत देखील 10% वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात एकमेकांशी भेटीगाठींचे प्रमाण वाढते. यामुळे श्वसनसंस्थेशी निगडित सर्व प्रकारच्या आजारांसह कोव्हिड आणि इन्फ्लुएन्झासारख्या विषाणूंचा संसर्गही अधिक तीव्र होतो.“ असे पी डी हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरचे कन्सल्टन्ट चेस्ट फिजिशियन डॉ. अशोक महाशूर यांनी सांगितले.

सीओपीडींशी झगडणा-या व्यक्तींना इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यास त्यांची तब्येत अधिकच खालावण्याचा धोका 40-60% असतो. म्हणून आधीच सुरक्षिततेची उपाययोजना करणे आणि इन्फ्लुएन्झा विषाणूंपासून संरक्षण पुरविणारी क्वाड्रिव्हॅलन्ट इन्फ्लुएन्झा लस घेणे अधिक चांगले. ही लस पाच वर्षांखालील मुलांना, इतर व्याधी असलेल्या प्रौढ व्यक्तींना व वयोवृद्ध व्यक्तींना हिवाळा सुरू होण्याआधी दिली गेली पाहिजे.’’असे ही डॉ. अशोक महाशूर पुढे म्हणाले.
श्वसनसंस्थेचे विकार असलेल्या रुग्णांना वर्षातून एकदा इन्फ्लुएन्झा लस देण्याची द सेंटर फॉर डिझिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) ने स्पष्ट केले आहे. इन्फ्लुएन्झा विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये सातत्याने बदल होत असल्याने विषाणूंशी लढा देण्यासाठी त्याच्या लशीमध्ये दरवर्षी बदल करावे लागतात. लसीकरणाचे अनेक फायदे असल्याचे सिद्ध झाले असून लस घेतल्याने इन्फ्लुएन्झासारख्या आजारांची लागण होण्याचा धोका कमी होतो. मोसमी संसर्गांवरचा तो सर्वाधिक परिणामकारक उपाय आहे. इन्फ्लुएन्झा लशी या इन्फ्लुएन्झाची तीव्रता कमी करण्याच्या कामी प्रभावी ठरतात असे ही ते पुढे म्हणाले.

इऩ्फ्लुएन्झा हा एक गंभीर स्वरूपाचा विषाणूजन्य संसर्ग आहे, जो फुफ्फुसे, नाक आणि घशावर हल्ला करतो. विशेषत: लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती किंवा गरोदर स्त्रियांना याचा संसर्ग झाल्यास हा विषाणू शरीराला दीर्घकालीन हानी पोहोचवू शकतो तर कॅन्सर किंवा श्वसनसंस्थेचे गंभीर विकार असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत काही वेळा तो जीवघेणाही ठरू शकतो.

Winter air pollution increases the risk of influenza The elderly with children should take care

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com