
मुंबईतील उन्हाची काहीली काहीशी कमी झाली असून मुंबईत रविवारी किमान तापमान 18 अंशांवर नोंदविण्यात आले.
मुंबई: मुंबईतील उन्हाची काहीली काहीशी कमी झाली असून मुंबईत रविवारी किमान तापमान 18 अंशांवर नोंदविण्यात आले. हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. मुंबईसह राज्यभरात थंडीची चाहूल सुरू झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान 18 अंशाच्या आसपास राहील. राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे 10.1 अंश सेल्सिअस आहे. पुढील 24 तासांत राज्यातील किमान तापमानात घट होईल, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. पुणे आणि नाशिक येथील किमान तापमानातही आणखी घट होईल. राज्यात हळूहळू थंडीची चाहूल सुरू झाली असून हिवाळा जाणवू लागला आहे.
अधिक वाचा- रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर RPF पथकाकडून कारवाई
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
सांताक्रूझ 18.4, पुणे 10.4, बारामती 11.4, नाशिक 10.1,औरंगाबाद 12.2, बीड 11.9, जालना 12.3, अकोला 12.7, नागपूर 12.9, परभणी 10.8, गोंदिया 10.5
राज्यातील ब-याच ठिकाणी तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील काही दिवसात किमान तापमानात घट होणार असून थंडीचे आगमन होणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Winter mumbai season lowest minimum temperature IMD official