मुंबई : विधान भवन परिसरात सलग दुसऱ्या दिवशी आत्मदहनाचा प्रयत्न!

vidhan-bhavan
vidhan-bhavansakal media

मुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या (Winter session) तिसऱ्या दिवशी एका महिलेनं मुंबईतील विधानभवन समोरच्या उषा मेहता चौकात (Usha mehta chauk) एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न (Self immolation) केला. पोलिसांनी हा प्रयत्न हानून पाडला, राजलक्ष्मी मधूसुदन पिल्ले (Rajlaxmi pillay) असं या 46 वर्षीय महिलेचं नाव आहे. सलग दुसऱ्या दिवशी या चौकात आत्मदहन करण्याचा प्रयत्न झाला आहे. (Rajlaxmi pillay self immolation near vidhan bhavan on second day of winter session also)

vidhan-bhavan
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहणाऱ्या राजलक्ष्मी यांनी पोलिसात तक्रार दिली होती की, बांधकाम व्यायवसायीक असलेले त्यांचे पती मधूसुदन पिल्ले यांनी एका व्यक्तीच्या फॅक्टरीचं बांधकाम केलं होतं आणि त्याला काही हात उसनीही दिली होती, त्यांचे पैसे परत मागायला गेले तेव्हा समरच्या व्यक्तीनं राजलक्ष्मी पिल्ले यांना धमकवायला सुरुवात केली.

पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही आणि धमकी देणाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही, त्यामुळं राजलक्ष्मी यांनी अधिवेशन सुरु असताना रॉकेल सदृष्य पदार्थ अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अधिवेशनासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने थांबवल. सदर महिलेला ताब्यात घेऊन मरीन ड्राईव्ह पोली स स्टेशनला आणलं. या महिलेवर आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून भा द वीच्या कलम 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com