
तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन येथील मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून रात्री घरी परतणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
भिवंडी : तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन येथील मैत्रिणीकडे कामाची चौकशी करून रात्री घरी परतणाऱ्या एका 42 वर्षीय महिलेवर पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ठरलं तर! आम आदमी पार्टी लढवणार 'केडीएमसी' निवडणूक; प्रचार समिती जाहीर
भिवंडी तालुक्यातील गोदामांमध्ये मजुरीच्या कामासाठी शेकडो स्त्री पुरुष येत आहेत; मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने काम मिळत नाही. त्यामुळे नवीन कामाच्या शोधात एक 42 वर्षीय महिला चरणीपाडा परिसरात आपल्या मैत्रिणीकडे नव्या कामाच्या चौकशीसाठी काल सायंकाळी गेली होती. मैत्रिणीकडे चहापान उरकून पीडित महिला रात्री उशिराने ती एकटीच राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वेलाईन शेजारील मुनिसुरत कंपाऊंडमधून काटेरी झाडाझुडपाच्या आडवाटेने आपल्या चरणीपाडा येथे घरी चालली होती. त्यावेळी रस्त्यात मद्यपी पाच युवकांच्या टोळक्याने महिलेस शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
या घटनेत अत्याचारग्रस्त महिला बेशुद्धावस्थेत त्याच ठिकाणी पडून होती. दुसऱ्या दिवशी या महिलेची माहिती नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर पोलिसांनी अज्ञात अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून जखमी महिलेस ठाणे येथील कळवा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. पोलिसांनी या गुुन्ह्याचा तपास करून माँटी कैलास वरटे (25), विशाल कैलास वरटे (23, दोघेही रा.भिवंडी), कुमार डाकू राठोड (25 रा. पूर्णा), अनिलकुमार शाम बिहारी गुप्ता (28) यांना यांच्यावर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
WHO नंतर वॉशिंग्टन पोस्टकडून मुंबई पालिकेसह धारावी पॅटर्नचं तोंडभरुन कौतुक
आज दुपारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता या चौघांनाही 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे, निरीक्षक रवींद्र वाणी करीत आहेत.
-------------------------------------------------------------
संपादन - तुषार सोनवणे