मुख्यमंत्र्यांचा बनावट आक्षेपार्ह फोटो ट्वीटरवर अपलोड करणा-या महिलेला अटक; राजकीय आयटी सेलशी संबधीत असल्याचा संशय?

अनिश पाटील
Thursday, 6 August 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोर्फ फोटो ट्वीटरवर शेअर करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 38 वर्षीय महिलेला अटक केली. या पोस्टमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही टिप्पणी करून बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोर्फ फोटो ट्वीटरवर शेअर करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी 38 वर्षीय महिलेला अटक केली. या पोस्टमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दलही टिप्पणी करून बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी मुंबईत सुरू होतेय 'पोस्ट कोव्हिड ओपीडी'; जाणून घ्या सविस्तर माहिती...

सुनैना होलेय(38) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून वयक्तीक जात मुचलक्यावर या महिलेची सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारदार धर्मेश मिश्रा यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 505(2), 500, 501, 504, 153 अ  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने केलेल्या ट्वीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो मॉर्फ करून त्यांना मौलवी दाखवले होते. तसेच त्याच्या खाली बदनामी कारक मजकूर लिहिण्यात आला होता.

कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी 

या ट्वीटर अकाउंटवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही बदनामीकारक उल्लेख करण्यात आला आहे. या महिलेने ट्वीटर अकाउंटवरून 25 जुलै, 28 जुलै आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप केले आहेत. तक्रारीनुसार या महिलेने जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महिला कुठल्या राजकीय पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित आहे का? हा तपासाचा भाग असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman arrested for uploading fake CMs offensive photo on Twitter; Suspected to be associated with a political IT cell?