Mumbai News : बागेश्वर धामला गेलेल्या उल्हासनगर येथील महिलेची निर्घृण हत्या; देवदर्शन ठरले अखेरचे

परिक्रमे दरम्यान झालेल्या गर्दीमुळे रामरती यांची त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून ताटातूट झाली. खूप शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत.
woman from Ulhasnagar murdered at Bageshwar Dham madhya Pradesh during trip marathi Crime News
woman from Ulhasnagar murdered at Bageshwar Dham madhya Pradesh during trip marathi Crime News

उल्हासनगर : मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे देवदर्शनासाठी गेलेल्या उल्हासनगरातील एका महिलेची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथील पत्रकार सुरेश चौहान यांच्या वयोवृद्ध सासूंची बागेश्वर धामच्या जवळ असलेल्या खडकाळ टेकडीवरील गुफेच्या बाजूला हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रामरती रामकुमार चौहान असे त्यांचे नाव असून त्यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम हिसकावून त्यांना दगडाने ठेचून ठार मारण्यात आले आहे. त्यांचे देवदर्शन अखेरचे ठरले आहे.

कॅम्प 3 येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे रामजनम चौहान हे त्यांची आई रामरती रामकुमार चौहान (65) आणि इतर कुटुंबीयांसह 26 मे रोजी कल्याणहून मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी परिक्रमे दरम्यान झालेल्या गर्दीमुळे रामरती यांची त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांपासून ताटातूट झाली. खूप शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत.

woman from Ulhasnagar murdered at Bageshwar Dham madhya Pradesh during trip marathi Crime News
Pune Porsche Accident: संपूर्ण अग्रवाल कुटुंब कोठडीत! कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईलाही अटक

त्यामुळे कुटुंबीयांनी भामिता पोलीस ठाण्यात (छत्तरपूर मध्य प्रदेश) याची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना 24 तासानंतर त्यांना आश्रमापासून दीडदोन किलोमीटर अंतरावरील खडकाळ टेकडीवरील गुफेच्या बाजूला एका वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौहान कुटुंबाला कळवल्यावर पोलीस त्यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले. चौहान यांनी आईला ओळखले. यावेळी रामरती यांच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम हिसकावून त्यांचे डोके दगडाने ठेचले असल्याचे आढळून आले. त्या पत्रकार सुरेश चौहान यांच्या सासू होत्या. रामरती यांच्यावर मध्य प्रदेशात शवविच्छेद केल्यावर त्यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील आझमगड येथील त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला असून तिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.

woman from Ulhasnagar murdered at Bageshwar Dham madhya Pradesh during trip marathi Crime News
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com