Dog Attack in Kalyan : भटक्या श्वानांनी तोडले महिलेचे लचके; श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी video viral
Dog attack CCTV Viral video टिटवाळ्यातील हृदयद्रावक घटना! एका महिलेवर तीन ते चार भटक्या श्वानांनी हल्ला चढवत, तिला फरफटत नेत तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले.
डोंबिवली - एका महिलेवर तीन ते चार भटक्या श्वानांनी हल्ला चढवत, तिला फरफटत नेत तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहेत. टिटवाळा येथील एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.