
मोखाडा : मोखाडा तालुक्यात माता बालमृत्यू प्रकरण थांबण्याचे नाव घेत नसून बेजबाबदार आरोग्यसेवेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील जोगलवाडी येथील गर्भवती महिला अविता कवर (२६) हिला प्रसुती कळा होत असताना वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने तिचे बाळ पोटातच दगावले असल्याची धक्कादायक घटना घडली.