मुंबई : महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) सार्वजनिक शौचालयात काम करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तक्रारदार महिलेने शौचालय वापरण्याचे पैसे आगाऊ न दिल्यामुळे तिला कपडे बदलत असताना बाहेर काढल्याचा आरोप केला आहे.
आता मुंबईच्या समुद्रकिनारी बिंधास्त करा, कोणालाही घाबरायचं नाही

अभिषेक श्रीवास्तव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदार ४० वर्षीय महिला सह्याद्री एक्स्प्रेसने २१ डिसेंबरला आली होती. त्या वेळी तिला कपडे बदलायचे असल्यामुळे ती फलाट क्रमांक १८ वरील शौचालयात गेली. तेथे देखरेख करणाऱ्या महिलेने तक्रारदार महिलेकडे पैशांची मागणी केली. त्या वेळी तिने शौचालयातून आल्यानंतर पैसे देईन असे सांगितले, पण शौचालयाची देखरेख करणाऱ्या महिलेने तक्रारदार महिलेला आधी पैसे दिल्याशिवाय शौचालयात जाता येणार नसल्याचे सांगितले. त्यावरून दोघींमध्ये भांडण झाले. त्यानंतर तक्रारदार महिला पैसे न देता शौचालयात गेली.
महत्वाचं - गेल्या 10 वर्षात फक्त मुंबईत हे दुसऱ्यांदा घडलंय
त्या वेळी शौचालयाची देखरेख करणाऱ्या महिलेने हा प्रकार तिच्या पतीला म्हणजेच आरोपी श्रीवास्तवला सांगितला. तो थेट तेथील कपडे बदलण्याच्या खोलीत गेला व दरवाजा ठोठावू लागला. त्या महिलेने अर्धा दरवाजा उघडला असता तिच्यासमोर श्रीवास्तव असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने तिचा हात धरून तिला तेथून बाहेर काढले.
विनयभंगाचा गुन्हा दाखल
पीडित महिलेने सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीवरून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.