esakal | मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा

मध्ये रेल्वे मार्गावर लहान मुलांसह महिला सर्रास प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. लहान मुलांना सार्वजनिक प्रवास करताना कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर मुलांसह महिलांचा प्रवास, रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचे तीनतेरा

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबईः कोरोनाच्या महामारीमुळे अद्याप सरसकट लोकल प्रवासाला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली नाही. तर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरसकट महिलांनाच  लोकल प्रवासाची परवानगी आहे. मात्र, मध्ये रेल्वे मार्गावर लहान मुलांसह महिला सर्रास प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. लहान मुलांना सार्वजनिक प्रवास करताना कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 

नुकतेच मध्य आणि पश्चिम रेल्वेनं लहान मुलांसह महिलांना लोकल प्रवास करता येणार परवानगी  देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, सध्या लहान मुलांसह महिला रेल्वे स्थानकांवर लोकलच्या प्रतिक्षेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सर्वाधिक मुलांसह महिलांचा प्रवास हार्बर मार्गावर होत असल्याचे यातून दिसून येत आहे. 

गेल्या 9 महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थिती सुरू झाली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून महिलांना नियोजित वेळी सरसकट प्रवासाची परवानगी मिळाली आहे. यामध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करण्याची परवानगी आहे. मात्र, अद्याप मुलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगितल्या जात आहे. 

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मध्य रेल्वे मार्गावर मुलांना आणि मुलांसह महिलेला लोकल प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही. एकट्या महिलेलाच प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, मुलांसह महिलांचा प्रवास केला जात असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाईल.
शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

-------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

women are traveling with children mumbai local train

loading image
go to top