बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे केले लक्ष केंद्रित

boardi
boardi

बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे.

डहाणु तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकु बागायती विकसित करण्यात आल्या आहेत.
जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, असे दोन हंगामात फळांचे उत्पादन भरपुर प्रमाणात होते. मात्र पावसाळ्यात फळांची नासाडी थांबवता येत नाही. परंतु हिवाळ्यात झाडावर पिकलेल्या फळांवर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ टिकवून ठेवणे शक्य होते.

डहाणू तालुक्यात समुद्र किनाऱ्यावर असलेल्या बोर्डी, घोलवड, नरपड गावात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. ताज्या चिकु सोबतच पर्यटकांना प्रक्रिया केलेल्या पदार्थांची आवड निर्माण झाल्याने मागणी वाढली आहे.

पर्यटकांकडून येणारी मागणी लक्षात घेऊन महिलांनी चिकु प्रक्रिया उद्योग सुरु केले आहेत. अनेक महिला पारंपारीक पध्दतीने तर काही महिला आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया उद्योग करीत आहेत.

फळावर प्रक्रिया करून चिकु चिप्स, पावडर, लोणचं, सुपारी, चॉकलेट, तयार करून विक्री करीत आहेत. सालाबाद प्रमाणे  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शनिवार दिनांक 2 व रविवार दिनांक 3 रोजी बोर्डी येथील सुपेह हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेच्या एस.आर.सावे शिबिर निवास (कँम्पिंग ग्राऊंड येथे होऊ घातलेल्या भव्य चिकु मसहोत्सवाच्या पार्श्वभुमिवर महिला सक्रिय झाल्या आहेत. पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या महोत्सवात चिकुफळांपासून तयार केलेल्या पदार्थाना मोठी मागणी होत असल्याने चॉकलेट, बर्फी, मिल्कशेक, आईस्क्रीय असे विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याच्या कामात महिला व्यस्त झाल्या आहेत.

लतिका पाटील, प्रक्रिया उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चिकु पासुन प्रक्रिया झाल्या आहेत.

लतिका पाटील, प्रक्रिया उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चिकु पासुन प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त काळ टिकतात तसेच खर्च कमी येतो. पदर्थानची गुणवत्ता चांगली राहते असा अनुभव आला. त्यामुळे ग्राहकाला समाधान मिळते.

अमोल पाटील (अध्यक्ष, चिकु महोत्सव समिती) चिकु महोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसात पन्नास हजार पेक्षा जास्त पर्यटक हजेरी लावतात त्यामुळे प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री भरपुर होते. 

बागायतदार आणि हॉटेल व्यवसाईकांनी सुरु केलेला सातवा महोत्सव आहे या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेळ असा विश्वास व्यक्त करुन महिला बचतगटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वस्तुंना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळेल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com