
मुंबई : नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार सकाळी पार पडला. यावेळी भाजप आणि शिवसेनेतील मिळून सर्व १८ पुरुष आमदारांनाच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्यानं महाविकास आघाडीकडून सडकून टीका करण्यात आली. हा आरोप करणाऱ्या विरोधकांना आता उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. (Women have no place in New Cabinet Fadnavis reacted on allegations)
फडणवीस म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. तसेच विस्तार झाला की सरकार पडेल असंही काही लोक म्हणत होते आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे. त्याचबरोबर महिला मंत्री नाही हा आरोपही लवकरच दूर होईल. महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. आधीच्या सरकारने जेव्हा विस्तार केला तेव्हा त्यांच्याकडे पण महिला मंत्री नव्हत्या. त्यामुळे त्यांना हे बोलायचा काहीही अधिकार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं.
ट्विटरवर यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का?
दरम्यान, ज्या पक्षाचे दोन मंत्री आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला सोशल मीडियावर आमच्या मंत्र्यांची यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? आधी त्यांनी आरसा पाहावा आणि त्यानंतर ट्विट करावं, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं.
संजय राठोडांच्या समावेशावर फडणवीस म्हणतात...
संजय राठोड यांच्यावर यापूर्वी भाजपनं गंभीर आरोप केले होते आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिपदावरुन खाली खेचलं होत. पण आता ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्यानं पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. यावर फडणवीस म्हणाले, संजय राठोड यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळं याबाबत आता अधिक बोलणं गरजेचं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.