पोलिसाने महिला पोलिसावर केला बलात्कार, घाटकोपरमधील घटना

नेमकं काय आहे प्रकरण?
rape case
rape case File photo

मुंबई: महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकारे करत असतात. पण सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलिसावर बलात्कार (Women police constable rape) झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. (Women police constable rape by friend in police department incident happened at Ghatkopar)

मुंबईच्या घाटकोपर पोलिस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली आहे. एका पोलीस शिपायाने लग्न करण्याचे आमीष दाखवून महिला पोलिसावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार देत फसवणूक केली. आरोपी पोलिस शिपायाचे पहिले लग्न झाले असून त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे पीडित महिला पोलिसाला आश्वासन दिले होते.

rape case
मुंबईत जूनमध्ये दुकानं उघडू शकतात पण...

मात्र लग्नसाठी आरोपी शिपाई टाळाटाळ करत असल्याने पीडीत महिलेने पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. २०१८ मध्ये हे दोघं मुंबई पोलिस आयुक्तालयात एकत्र कार्यरत असताना दोघांची ओळख झाली होती. घाटकोपर पोलिसांनी पीडित महिला पोलिसाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com