नवी मुंबईत महिला असुरक्षित; दर दोन दिवसांत एका महिलेवर बलात्कार | Navi mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

नवी मुंबईत महिला असुरक्षित; दर दोन दिवसांत एका महिलेवर बलात्कार

वाशी : नवी मुंबई (Navi Mumbai) जागतिक महिला दिन मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. यावेळी महिला सक्षमीकरण, त्‍यांचा सन्मान, कार्यकर्तृत्‍वाचा गौरव (woman empowerment) आदी कार्यक्रम ठिकठिकाणी पार पडले. मात्र शहरातील महिला असुरक्षित असल्याचे त्‍यांच्याविरोधात घडलेल्‍या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. नवी मुंबईत दर दोन दिवसांत एका महिलेवर बलात्काराची (rape cases) घटना घडत आहे; तर दर दोन दिवसांनी एकीचा विनयभंग होतो.

हेही वाचा: "विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद्‍ध्वस्त करण्याऱ्यांची CBI चौकशी व्हावी"

शहरामध्ये औद्योगिक केंद्र व आयटी पार्क मोठ्या संख्येने असल्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. शिवाय स्‍मार्ट सिटी म्‍हणून ओळख निर्माण केलेल्‍या नवी मुंबईत अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय शैक्षणिक संकुले असल्‍याने शिक्षणासाठी परराज्‍यातून अनेक मुली येतात. पोलिस नियंत्रण कक्षात संपर्क साधल्‍यास पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होत नसल्याचे अनुभव अनेकदा नागरिकांना येतो.

तसेच गर्दुल्ले, भिकारी, उनाड मुलांवर कारवाई करण्यात येत नसल्यामुळेही अनेकदा महिलांना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा झोपडपट्टी तसेच गाव गावठाण भागात रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे महिलांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतो.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात दाखल गुन्हे

वर्ष - बलात्‍कार - विनयभंग
२०१५ - १०६ - २०२
२०१६ - १४२ - १८९
२०१७ - १३१ - १९६
२०१८ - १५३ - २२६
२०१९ - १६९ - २५१
२०२० - १२५ - १९८
२०२१ - २१२ -

Web Title: Womens Are Not Safe In Navi Mumbai According To Crime Cases Happened With Womens Crime News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi Mumbaicrimerape news