esakal | नवीन पत्रीपुलाच्या दुसऱ्या टप्यातील गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात; वाहतुकीतील बदल जाणून घेण्यासाठी वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन पत्रीपुलाच्या दुसऱ्या टप्यातील गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात; वाहतुकीतील बदल जाणून घेण्यासाठी वाचा

कल्याणमधील बहुचर्चित  नवीन पत्रीपुलाच्या दुसरा गर्डर टाकण्याच्या कामाला सोमवारी (ता. 14) पासून पुढील चार रात्रीत 10 ते पहाटे 5 या काळात करण्यात येणार आहे

नवीन पत्रीपुलाच्या दुसऱ्या टप्यातील गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात; वाहतुकीतील बदल जाणून घेण्यासाठी वाचा

sakal_logo
By
रविंद्र खरात


कल्याण: कल्याणमधील बहुचर्चित  नवीन पत्रीपुलाच्या दुसरा गर्डर टाकण्याच्या कामाला सोमवारी (ता. 14) पासून पुढील चार रात्रीत 10 ते पहाटे 5 या काळात करण्यात येणार आहे. या वेळी हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गाडी पूल ते पत्रीपुल व्हाया शिळफाटा रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या कोरोना मृत्यूदराबाबत दिलासादायक अपडेट; परंतु राज्यातील परिस्थिती चिंताजनकच

राज्य रस्ते विकास महामंडळतर्फे कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रीपुल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम  दोन वर्षापासून सुरू आहे. आता हे काम अंतिम टप्यात असून त्यावर दुसरा गर्डर  टाकण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून चार रात्री 10 ते पहाटे 5 या काळात काम करण्यात येणार असल्याने या परिसर मधील वाहतूक बदल केले आहे, अशी माहिती कल्याण पूर्व कोळशेवाड़ी वाहतूक पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ यांनी दिली.

बदल असा
1. कल्याणमधून पत्री पूल मार्गे शिळफाट्याकडे जाणाऱ्या जड / अवजड वाहनांना राजनोली नाका येथे प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून रांजनोली नाका भिवंडी येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 वरून खारेगाव टोलनाका - मुंब्रा बायपास मार्गे पुढे जाता येणार आहे.

2. कल्याण शहरातून पत्री पूल मार्गे शिळफाटाकडे जाणाऱ्या मध्यम आणि हलक्या वाहनांना दुर्गामाता चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  या वाहनांनी दुर्गामाता चौकातून डाव्या बाजूने आधारवाडीचौक, खडकपाडा चौक भवानी चौक (प्रेम ऑटो सर्कल), नेताजी सुभाष चौक, वालधुनी रेल्वे ब्रीज, स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल मार्गे पुढे जावे.

3. कल्याण - नगर महामार्गावरून पत्री पूलमार्गे शिळफाटा रोडकडे जाणाऱ्या वाहनांना कल्याणमधील सुभाष चौकात बंदी असेल. या मार्गावरील वाहनांनी सुभाष चौकात डाव्या बाजूने वालधुनी ब्रीज आणि स्वर्गीय आनंद दिघे उड्डाण पुलावरून पुढे जावे.

4. कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पूर्वेस जोडणारा जुना पत्री पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कल्याण पूर्वेकडील सूचक नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील सर्व वाहने कल्याण शीळ रोडवरील कल्याण पूर्व सूचक नाका येथून उजवीकडे वळून पुढे जातील. कल्याण फाटा कडून कल्याण पश्चिमेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कल्याण फाटा – खारगाव टोल नाका येथे पुढे जावे

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image