esakal | संप नाही, बेस्टचे कामगार आता करणार धरणे आंदोलन!
sakal

बोलून बातमी शोधा

Best-Buses

उपक्रमातील 98 टक्के कामगारांनी संपाच्या निर्णयाला पाठिंबा दिला, तर दोन टक्के कामगारांनी संप नको, असा गुप्त मतदानाद्वारे कौल दिला आहे. त्यामुळे संपाची टांगती तलवार कायम आहे. 

संप नाही, बेस्टचे कामगार आता करणार धरणे आंदोलन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्ट उपक्रमातील शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने प्रशासनासोबत येत्या 27 ऑगस्टपर्यंत सातवा वेतन करार करण्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत सेनेच्या प्रशासनाशी वाटाघाटी सुरू आहेत. अशा वेळी संप करून त्यात अडथळा नको, अशी भूमिका घेत संप करण्याऐवजी कामगार वडाळा आगारासमोर येत्या सोमवारी (ता. 26) धरणे आंदोलन करणार आहेत. त्याद्वारे कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय शनिवारी (ता.24) बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने घेतला आहे. उपक्रमातील 98 टक्के कामगारांनी संपाच्या निर्णयाला पाठिंबा दिला, तर दोन टक्के कामगारांनी संप नको, असा गुप्त मतदानाद्वारे कौल दिला आहे. त्यामुळे संपाची टांगती तलवार कायम आहे. 

प्रलंबित वेतनकरार, अर्थसंकल्पाचे विलिनीकरण, दिवाळी बोनस आणि इतर मागण्यासाठी संप करण्याचा इशारा कृती समितीने दिला होता. त्याबाबत काल (ता. 23) कामगारांचा कौल मतदानाद्वारे अजमावण्यात आला. 98 टक्के कामगारांनी संप करण्याच्या बाजूने तर दोन टक्के कामगारांनी संप करू नये असा कौल दिला. मतदानात 19656 कामगारांनी भाग घेतला. त्यापैकी 19083 कामगारांनी संपाच्या बाजूने तर 465 कामगारांनी संपाच्या विरोधात कौल दिला.

या मतदानावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याने काही आगारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. असाच कौल गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या संपाच्या वेळी कृती समितीने घेतला होता. त्यातुलनेत यावेळी मतदानाला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले. वेतन सुधारणा करावी, अर्थसंकल्पाचे विलीनीकरणाच्या ठरावाची अंमलबजावणी तातडीने करावी, पालिका कर्मचाऱ्यांइतके सानुग्रह अनुदान बेस्ट कामगारांना जाहीर करावे आदी मागण्या त्यांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. 

मंगळवारी वेतन करार 
येत्या मंगळवारी (ता. 27) वेतन करार होणार आहे. कामगार सेनेची बेस्ट प्रशासनासोबत चर्चा सुरू असताना केवळ विरोधासाठी विरोध म्हणून आम्ही संप करू इच्छित नाही. कामगारांच्या प्रलंबित मागण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षवेधी धरणे धरणार आहोत. प्रश्‍न मार्गी न लागल्यास नाईलाजाने संपाचा निर्णय घ्यावा लागेल. 
- शशांक राव, नेते, बेस्ट संयुुक्त कृती समिती 

loading image
go to top