'साहब...हम फिरसे मुंबई नही आयेंगे', असं म्हणणारे श्रमिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबईत येण्याच्या तयारीत

संजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

स्थलांतरीत मजूर पुन्हा मुंबईकडे वळत आहेत. मुंबईत येणाऱ्या ट्रेन आरक्षणात आता वेटिंग लिस्ट सुरु झाली आहे.

मुंबई ः लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काही दिवसातच स्थलांतरीत मजूर गावाकडे परत जाण्यासाठी आतूर होते, पुन्हा मुंबईत परतणर नाही असेच सांगत होते, पण आता तीच पावले, पुन्हा मुंबईकडे वळत आहेत. मुंबईत येणाऱ्या ट्रेन आरक्षणात आता वेटिंग लिस्ट सुरु झाली आहे.

वाचा - राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

लॉकडाऊन कालावधीत चालवण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेन तसेच अन्य मार्गांनी सुमारे 18 लाख लोक राज्यातून गेल्याचे सांगितले जात होते. मुंबईतून दहा लाख स्थलांतरीत कामगार गेले होत. त्यातील सात लाख ट्रेनने गेले होते. मात्र आता त्यातील परतीचा प्रवास सुरु झाला आहे. कोरोना कालावधीतील स्पेशल ट्रेन सुरु झाल्या, त्यावेळी मुंबईतून जाणाऱ्या ट्रेन पूर्ण क्षमतेने जात होत्या, तर परतीच्या ट्रेन 70 टक्के क्षमतेनेच येत होत्या, पण आता या ट्रेन शंभर टक्के क्षमतेने परतत आहेत. मध्य रेल्वेद्वारे चार लाख तर पश्चिम रेल्वेद्वारे साडेतीन लाख लोक मुंबईत आले आहेत. 

वाचा - पालकमंत्री एकनाथ शिंदे थेट कोव्हिड वॉर्डात; रुग्ण आणि डॉक्टरांची केली विचारपूस..

उत्तर प्रदेशातून मुंबईत येणाऱ्या कामायनी तसेच महानगरी एक्सप्रसेची वेटिंग लीस्ट दीडशेपर्यंत गेली आहे. बारा ऑगस्टनंतर नियमीत रेल्वे सेवा सुरु झाली तर वेटिंग लीस्ट वाढेल. एवढेच नव्हे तर काही स्पेशल ट्रेन चालवणे भाग पडेल असाही अंदाज आहे.

मुंबईत चहाची टपरी असलेल्या कान्हाराम सिरोही यांनी मुलांच्या शाळा लवकरच सुरु होतील, त्यामुळे आम्ही लवकर परतलो असे सांगितले तर रिक्षाचालक असलेल्या संतोष यादवने मुंबईहून गावाकडे जाण्यासाठी पन्नास हजार खर्च झाले होते, पण काम तर मुंबईतच आहे असे त्याने सांगितले.

--------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers preparing to return to Mumbai for subsistence