
मुंबई : जगातील सर्वात (World biggest Indian Flag) मोठा आणि वजनदार राष्ट्रध्वज भारतीय नौदलाच्या (Indian Navy) पश्चिम विभागाने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) नौदल गोदीच्या टोकाला उभारला आहे. 225 फूट रुंद 150 फूट उंच व चौदाशे किलो वजनाचा (Fourteen hundred kilogram weight) हा राष्ट्रध्वज खादी ग्रामोद्योग विभागाने (Khadi and village industries) तयार केला आहे.
सध्या सुरु असलेल्या नौदल सप्ताहानिमित्त नौदलाचे विविध उपक्रम सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. खादीचा हा राष्ट्रध्वज धरून ठेवण्यासाठी दोन विशेष क्रेनचा वापर करण्यात आला आहे. नौदल गोदीतच हा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे. कालपासून हा ध्वज उभारण्याचे काम सुरु होते. एरवी खांबावर किंवा अन्य मार्गाने त्याला बांधून उभा करणे फारच कटकटीचे ठरले असते.
खांबावर उभारला असता तरी त्याची दुसरी बाजू खालच्या दिशेने झुकली असती व त्या ध्वजाचे सौंदर्य खुलून दिसले नसते. त्यामुळे त्याला ताठ उभे ठेवण्यासाठी बऱ्याच विचारांती क्रेनचा वापर करण्याचे ठरले. खादी ग्रामोद्योग विभागाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त या ध्वजाची संकल्पना मांडून तो तयार केला. त्यानंतर नौदल दिनानिमित्त त्या ध्वजाचे अनावरण करून तो राष्ट्राला अर्पण करण्याची जबाबदारी नौदलाने स्वीकारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.