जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावाला पुरवणार सिलींडर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जून 2019

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे.

मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे.

प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत एमएलएलने एलपीजी कनेक्‍शनच्या 102 अर्जांवर अगोदरच प्रक्रिया केली आहे आणि आणखी 54 वर प्रक्रिया सुरू आहे. गावातील रहिवासी स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करतात. यामुळे पर्यावरणाबरोबरच लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. एमएलएलने हा उपक्रम हाती घेतला आणि त्याविषय, तसेच घरात सुरक्षितपणे स्वयंपाक करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पर्यायांविषयी जागृती करत आहे. सध्या, कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा या पाड्यांवर लक्ष केंद्रित केले असून, लवकरच संपूर्ण गावाचा समावेश केला जाणार आहे.

भारतात 24 कोटी घरे असून त्यातील 10 कोटी घरांमध्ये अद्यापही स्वयंपाकासाठी एलपीजी आलेला नाही. पीएमयूवाय वेबसाइटनुसार, या घरांना स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या यावर अवलंबून राहावे लागते. इंधन जाळल्याने निर्माण होणारा धूर घरगुती प्रदूषण निर्माण करतो, तसेच श्वसनविषयक अनेक आजार व डिसऑर्डर यांना कारणीभूत ठरून, महिला व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अस्वच्छ इंधनापासून निर्माण झालेला धूर महिलांच्या नाकावाटे आत जाणे हे एका तासात 400 सिगारेट फुंकण्यासारखे असते.

महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी यांनी सांगितले की, 'महिंद्रा लॉजिस्टिक्‍समध्ये आम्ही महिलांच्या सुरक्षेला व सबलीकरणाला महत्त्व देत आहे. या उपक्रमाद्वारे, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवून महिला व बालकांची सुरक्षितता जपण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या इंधनाच्या वापराने, त्यांना स्वयंपाकघरातील धुरामध्ये आरोग्याच्या बाबत तडजोड करावी लागणार नाही किंवा असुरक्षित इंधन गोळा करण्यासाठी फिरावे लागणार नाही. या उपक्रमांतर्गत, आर्थिक वर्ष 20 मध्ये जास्तीत जास्त एलपीजी कनेक्‍शन देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि त्याद्वारे महिलांना सक्षम केले जाईल, शिवाय निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी त्यांच्या जीवनात बदल आणले जातील.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Environment Day and mahindra logistics ltd lpg cylinder