World Hepatitis Day! यकृतात चरबी वाढू देऊ नका; होऊ शकतात गंभीर आजार

World Hepatitis Day! यकृतात चरबी वाढू देऊ नका; होऊ शकतात गंभीर आजार


मुंबई : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे कित्येक आजारांना निमंत्रण मिळते. अशाच गंभीर आजारांपैकी एक असलेला फॅटी लिव्हर आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.  त्यातच सध्या या आजाराशी  संबंधीत हेपॅटिटीस समस्याही वाढू लागली आहे.

फॅटी लिव्हरची समस्या वेळीअवेळी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे उद्भवू शकते.   यकृत अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज यामध्ये यकृतामध्ये चरबी जमा होते.

यकृतामध्ये चरबी वाढते तेव्हा फॅटी लिव्हर ज्याला हेपॅटिक स्टेटोसिस देखील म्हणतात. आपल्या यकृतामध्ये जास्त चरबी निर्माण होणे अतिशय गंभीर आहे. जेव्हा मद्यसेवन न करणा-या व्यक्तीमध्ये फॅटी लिव्हर विकसित होते तेव्हा त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) होतो. हे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होते. यामुळे हेपेटायटीस देखील होऊ शकतो. आणि एखाद्याच्या यकृतास कायमचे नुकसानही करू शकते.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि मेटाबोलिक सिंड्रोम  जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असलेले 25 दशलक्ष रूग्ण आहेत. ज्यांना यकृताच्या गंभीर आजाराचा धोका असू शकतो. देशात याचे प्रमाण 9% ते 35% इतके आहे. तर मुंबईत हे प्रमाण  16.6 आणि  49 टक्के मधुमेहाच्या रुग्णांना फॅटी लिव्हरचा आजार असल्याचे सांगितले जाते. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हा चयापचय सिंड्रोमशी संबंधित आहे. मधुमेह इन्शूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे, लठ्ठपणा इत्यादींसह पचनाची समस्या निर्माण होते.

या आजाराला एनएएफएलडीला सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते. हा रोग अनुवांशिक आहे आणि मेटॅबोलिक सिंड्रोमचा एक भाग आहे ज्यामध्ये जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉलची समस्या आणि थायरॉईड असलेल्या रूग्णांचा समावेश आहे. एनएएफएलडीमुळे हिपॅटायटीस, लिव्हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होतो.

दोन प्रकारचे चरबीयुक्त यकृताचे आजार असतात -  नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (अल्कोहोलिक स्टिटोपेहटाटिस). सध्याच्या काळात जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे तरुण वयातील व्यक्तींना हा चरबीयुक्त यकृताचा आजार जडत आहे. त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. असे झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले.

नागरिकांनी लक्ष ठेवा:

निरोगी जीवनशैली, व्यायाम, वजन कमी आणि पौष्टिक आहारासह आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा आणि सर्व प्रकारचे धान्य यांचा आहारात समावेश असू द्या.  कार्बोहायड्रेट्स, मिठाई, ट्रान्स फॅट्स आणि अल्कोहोलच्या वापरावर मर्यादा घाला. आपल्या रक्तातील साखर, ट्रायग्लिसेराइड पातळी आणि कोलेस्टेरॉलची यावर नियंत्रण आणा.
--------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com