
मुंबई: गेल्या एका वर्षात पालिका आणि त्यांच्या डॉक्टरांकडे बर्याच समस्या आल्या आहेत, त्यातील एक किडनीच्या आजारांनी त्रस्त असलेले कोविडने देखील संक्रमित आहेत. कोरोना विषाणू किडनी विकारांनी ग्रस्त रुग्ण आणि डॉक्टरांसाठी एक आव्हान आहे.
पालिकेच्या सेव्हन हिल्स, सायन आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोना-संक्रमित झालेल्या किडनी विकाराच्या रुग्णांची योग्य वेळी तपासणी आणि त्यावर उपचार केले गेले तर 76 टक्के रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात.
एप्रिल-मेमध्ये जेव्हा डायलिसिसच्या अनेक रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, तेव्हा पालिकेने तातडीने या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. पालिका रूग्णालयातील डॉक्टरांनी वेळेवर उपचार आणि डायलिसिसद्वारे साथीच्या काळात 2300 कोरोना बाधित किडनी विकारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.
काही अशाही अनेक घटना घडल्या. डायलिसिसवेळी रुग्णाच्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह होता. या प्रकरणात संबंधित डायलिसिस सेंटरला 2 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सॅनिटाईझ करून पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले, अशा परिस्थितीत अनेक डायलिसिस केंद्रे बंद होती. त्यामुळे संबंधित केंद्रातील रुग्णांना डायलिसिससाठी भटकंती करावी लागली.
अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोविड आणि कोविड नसलेल्या डायलिसिस रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने केईएम, सायन, नायर, कूपर, सेव्हन हिल्स, बीकेसी जंबो कोविड केअर सेंटर आणि इतर रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस सुविधा सुरू केली. कोरोनाने संक्रमित 2300 हून अधिक किडनी विकारांनी ग्रस्त मूत्रपिंड रूग्णांवर पालिका रुग्णालयात डायलिसिस आणि उपचार केले गेले आहेत.
समर्पित टीमद्वारे उपचार
कोविड संक्रमित किडनी विकारांच्या रूग्णांसाठी आम्ही 45 बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार केला आहे. डायलिसिससाठी 8 बेड्स कोविड रूग्णांसाठी स्वतंत्रपणे राखून ठेवले होते. आम्ही औषध विभागातील किडनी तज्ज्ञ आणि डॉक्टरांची एक टीम नियुक्त केली जेणेकरुन रुग्णांना अधिक चांगली देखरेख आणि उपचार मिळावेत. वेळेवर तपासणी आणि उपचारांनी चांगले परिणाम दर्शवले आहेत.
डॉ. तुकाराम जामले, प्रमुख किडनी विभाग, केईएम रुग्णालय
कोरोना-डायलिसिसची आकडेवारी
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील सुमारे 10 हजार रुग्ण डायलिसिसवर जगतात. त्यापैकी गेल्या एक वर्षात कोविडमध्ये 2300 रुग्ण संक्रमित झाले. बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये 1000 रूग्णांवर सर्वाधिक उपचार केले गेले आहेत. सेव्हन हिल्समध्ये 467, नायरमध्ये 442, केईएममध्ये 10, सायनमध्ये 200 आणि कूपरमध्ये 160 आणि इतर रूग्णालयात कोविड आणि डायलिसिसवरील रुग्णांवर उपचार केले गेले.
ही सामान्य समस्या
अभ्यासात किडनीच्या 310 रूग्णांचा समावेश होता. कोरोना-संक्रमित किडनीच्या 80 टक्के रुग्णांना ताप होता. 61 टक्के लोकांना श्वासोच्छवासाची समस्या होती. यापैकी बर्याच रूग्णांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब देखील आहे. आमच्या असे ही लक्षात आले की 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रूग्णांमध्ये 5 वेळा पॉझिटिव्ह नोंद झाली आहे. म्हणजेच रिकव्हरीसाठी आणखी थोडा वेळ लागू शकतो. मात्र रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आठवड्यातच रुग्णालयात दाखल केले तर त्याचा जीव वाचू शकतो. आमच्या अभ्यासामध्ये रुग्णांचा रिकव्हरी दर 76 टक्के होता. हा अभयास आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.
डॉ.हर्षलकुमार एन. महाजन, सहाय्यक प्राध्यापक, कम्युनिटी मेडिसीन विभाग, सेव्हन हिल्स रुग्णालय
------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
World Kidney Day bmc support corona infected dialysis patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.