...तोपर्यंत लढा सुरूच राहणार; अखिल बीडीडी चाळ संघटनेचा इशारा

bdd chawl
bdd chawlsakal media
Updated on

मुंबई : वरळी (worli) बीडीडी चाळ (bdd chaul) पुनर्विकास प्रकल्पाला (redevelopment project) सुरुवात झाली असून नायगाव (naigaon) येथील चाळींच्या पुनर्विकासाचे काम पुढील दहा दिवसांत सुरू करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्र्यांनी केली आहे. यावरून अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनेने रहिवाशांच्या हिताच्या मागण्या (society people demands) जोवर पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संघटनेचा लढा (union fight) सुरू राहील. प्रसंगी सरकारविरोधात आंदोलन करू (strike) असा इशारा संघटनेने दिला आहे.

नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात नुकतीच ललित कला भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपल्या मागण्या आव्हाड यांच्या समोर मांडून चाळीचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी केली. रहिवाशांसोबत घराचा करारनामा आधी करावा, 1996 च्या पुराव्याची अट रद्द करावी, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणारे बायोमेट्रिक सर्वेक्षण रद्द करावे व पीडब्लूडी विभागामार्फत 2021 पर्यंत घ्या रहिवाशांची पात्रता निश्चित करण्यात यावी, 33(9) बी 3 ए व बी हा कायदा रद्द करावा.

bdd chawl
पाश्चिम उपनगरात सुविधा वाढवण्यावर भर ; 'या' रुग्णालयात 63 'ICU' बेड

म्हाडाच्या 56 वसाहतींना 33(5) हा कायदा लागू केला आहे. तो कायदा बीडीडी चाळी रहिवाशांना लागू करावा, बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना पुनर्विकास प्रकल्पात घर देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केल्या. संघटनेच्या मागण्या सरकारने मान्य करून परिपत्रक काढावे. जोवर सरकार जीआर काढत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार व यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन देखील करू अशी कठोर भूमिका डॉ. राजू वाघमारे यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com