BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा नारळ कधी फुटणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले...

Jitendra Awhad
Jitendra Awhadsakal media

मुंबई : कोकणात पावसाने (Kokan Heavy Rainfall) घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वरळी येथील बीडीडी चाळ (Worli BDD Chaul) पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ पुढे ढकलण्यात आला आहे. भूमिपूजन सोहळ्याच्या (Inauguration) तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ( Worli Bdd chaul redevelopment postponed due to heavy rainfall says Jitendra Awhad-nss91)

वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाला होता. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. प्रकल्पासाठी कंपन्यांची निवड झाल्यानंतरही पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. वरळी बीडीडी चाळीचा सुधारित आराखडा तयार केल्यानंतर अखेर येथील मैदानात पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे.

Jitendra Awhad
मुंबईत कोरोनोचा विळखा सैल, फक्त 557 गंभीर रुग्ण, जाणून घ्या सविस्तर

याचा भूमिपूजन सोहळा मंगळवार 27 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. मात्र कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थितीमुळे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबतची माहिती आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या कार्यक्रमाच्या तारखेची घोषणा लवकरच केली जाईल, असेही माहिती त्यांनी दिली आहे. दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद मनाववा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मतही त्यांनी ट्विटवर व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com