'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', वाचलेल्या विश्वजीतने सांगितला भयानक अनुभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', 'टायटॅनिक पेक्षाही भयानक स्थिती'

'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', 'टायटॅनिक पेक्षाही भयानक स्थिती'

मुंबई: सोसाट्याचा सुटलेला वारा, १५ मीटर उंचीपर्यंत उसळणाऱ्या लाटा, खवळलेला समुद्र आणि या सगळ्यामध्ये सुरु होता जगण्यासाठी संघर्ष. हे चित्र होते, चार दिवसांपूर्वी अरबी समुद्रात बुडालेल्या P 305 जहाजावरील. 'तौक्ते' चक्रीवादळाच्या (taukte cyclone) तडाख्यात सापडलेलं हे जहाज सोमवारी अरबी सुमद्रात (arbian sea) बुडालं. हे जहाज बुडत असताना भारतीय नौदलाने (indian navy) रेसक्यु ऑपरेशन करुन अनेकांचे जीव वाचवले. याच बचावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा भयानक अनुभव कथन केला आहे. (Worse than Titanic Rescued crew of sinking barge recall recall horror at sea)

"बऱ्याच लोकांनी टायटॅनिक चित्रपट पाहिला असेल. यात बुडणाऱ्या जहाजावरील प्रवाशी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारतात. अनेकांचे मृतदेह समुद्राच्या पाण्यावर तंरगताना चित्रपटात दाखवलं आहे. हेच सर्व आम्ही आमच्या डोळ्यांसमोर घडताना पाहिलं असं विश्वजीत बांडगर यांनी सांगितलं. ते P 305 जहाजावर वेल्डर म्हणून काम करायचे. नौदलाने त्यांची सुटका केली.

हेही वाचा: महाराष्ट्रात तरुणाईच्या मृत्यूचे प्रमाण जास्त का ?

तौक्तेच्या तडाख्यात सापडून P 305 जहाज अरबी समुद्रात भरकटलं. आतापर्यंत २६ मृतदेह नौदलाच्या हाती लागले असून ४९ जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. "टायटॅनिक पेक्षाही डोळ्यासमोर दिसणारं चित्र वाईट होतं. आम्ही आमच्या सहकाऱ्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले" असे विश्वजीत म्हणाले. "जीव वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी आमच्या डोळ्यासमोर उड्या मारल्या. पण त्यांची जीवरक्षक बोटही टिकली नाही" असे विश्वजीत बांडगर म्हणाले.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींचं विमान महाराष्ट्रात सुद्धा वळेल - संजय राऊत

सोलापूरच्या मंगळवेढा शहराचे ते निवासी आहेत. "त्या दिवशी नौदल आमच्यासाठी देवासारखं धावून आलं. आमची सुटका होईल, याची आम्हाला खात्री नव्हती. त्या भयानक परिस्थितीत आपण जिवंत राहणार, काळजी करण्याचं कारण नाही, असं सांगून आम्ही परस्परांचा विश्वास वाढवत होतो. मी लाईफ जॅकेट घालून १४ तास पाण्यात होतो. सोसाट्याचा वारा वाहत होता, १५ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या" असे विश्वजीत बांडगर यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top