यामीला करायची आहे शेती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

मूळची हिमाचल प्रदेशची असल्याने यामीला शेतीची आवड लहानपणापासूनच आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमने आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे; मात्र आता शेती करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय शेती करण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

मूळची हिमाचल प्रदेशची असल्याने यामीला शेतीची आवड लहानपणापासूनच आहे. सध्या रासायनिक खतांच्या वापरामुळे भाज्यांची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे मी सेंद्रीय शेती करणार आहे, असे यामीने म्हटले आहे. तसेच माझे गावाकडचे घर पारंपरिक पद्धतीचे असल्याने ते तसेच ठेवायला मला नक्कीच आवडेल आणि घराजवळच शेती करणार असल्याचे यामीने सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yami gautam wants to do oraganic farming