मुंबईकरांना यंदा पाणीकपातीचे ‘नो टेन्शन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाण्याचा साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

मध्य वैतरणा आणि भातसा ही धरणे पावसाळ्यात पूर्ण भरत नाहीत, असा अनुभव आहे; मात्र यंदा ही धरणे भरत आली आहेत. मध्य वैतरणा धरणाची पूर्ण भरण्याची पातळी २८५ मीटर आहे. हे धरण २८४.१८ मीटर भरले आहे. भातसा धरण पूर्ण भरण्याची पातळी १४२.०७ मीटर असून ते १४१.२७ मीटर भरले आहे. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ही दोन धरणे लवकरच भरून वाहू लागतील. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या दोन्ही धरणांचे पाच ते आठ गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. 

जून महिन्यापासून मुंबईत पावसाचा मुक्काम आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांच्या क्षेत्रातही पाऊस कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट टळले आहे. 

तलावांतील जलसाठा
 (दशलक्ष लिटरमध्ये)
२०१७ - १४१२७५४
२०१८ - १३९८१३८
२०१९ - १४१४४९२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year no tension to mumbaikar for water