esakal | आव्हाड म्हणतात, आजही माझ्या नावावर आदर्शमध्ये फ्लॅट
sakal

बोलून बातमी शोधा

Yes I Have A Flat In Adarsh Society Says MLA Jitendra Awhad

राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 03) आपला उमेदवारी अर्ज भरला. आव्हाड यांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याचे नमूद केले आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने फ्लॅट दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर अनेक नेत्यांची सीबीआय चौकशीही झाली होती, त्यावेळी आव्हाडांनी मला मुंबईत घर हवं होतं, म्हणून फ्लॅट घेतल्याचे सांगितले होते.

आव्हाड म्हणतात, आजही माझ्या नावावर आदर्शमध्ये फ्लॅट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 03) आपला उमेदवारी अर्ज भरला. आव्हाड यांनी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मुंबईतील वादग्रस्त आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याचे नमूद केले आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने फ्लॅट दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर अनेक नेत्यांची सीबीआय चौकशीही झाली होती, त्यावेळी आव्हाडांनी मला मुंबईत घर हवं होतं, म्हणून फ्लॅट घेतल्याचे सांगितले होते.

लष्करातील जवानांच्या विधवा पत्नींसाठी या सोसायटीत फ्लॅट राखीव असताना ते राजकीय नेत्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. आता आव्हाड यांच्या प्रतिज्ञापत्राच्या निमित्तानं आदर्शचं नाव पुन्हा समोर आलं आहे.

आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्रात आदर्शच्या सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाचा फ्लॅट आपल्याला मिळाल्याचे म्हटले आहे. ही मालमत्ता विवादित असल्याचेही आव्हाड यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. या फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ ६३६ चौरस फूट असून वापरता येणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ ५२१ चौरस फूट असल्याचे सांगण्यात आले आहे. खरेदीच्या वेळी या फ्लॅटची किंमत एक कोटी पाच लाख रुपये इतकी होती असे आव्हाड यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रतिज्ञापत्रानुसार आव्हाड यांची एकूण जंगम मालमत्ता १३ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपयांहून अधिक आहे. तर स्थावर मालमत्ता २७ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांहून अधिक आहे. आव्हाड यांनी २५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम गुंतवली असल्याचे म्हटले आहे.

loading image
go to top