स्टंटबाजी जीवावर बेतली, सुर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

नविद शेख
Friday, 4 September 2020

जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे.

मनोर : गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीपात्रात बुडून एका तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाला आहे. संजित कनोजिया (17) असे मृत तरुणाचे नाव असून, तो चिल्हार बोईसर रस्त्यावरील मान गावच्या ओस्तवाल वंडर सिटीचा रहिवासी होता.

नक्की वाचा : हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार

शुक्रवारी दुपारी आपल्या तीन मित्रांसोबत संजीत कानोजिया गुंदले गावच्या हद्दीतील सुर्या नदीत पोहोण्यासाठी आला होता. तिघेही नदी पात्रात पोहोत असताना बंधाऱ्यावरुन उड्या मारत स्टंटबाजी करीत होते. स्टंटबाजी दरम्यान दोघे जण बंधाऱ्याच्या खालच्या भागात पडल्याने पाण्यात बुडू लागले होते. स्थानिकांनी एका तरुणाला बुडताना वाचवले परंतु संजीतचा दुर्दैवी मृत्यू झाला. बोईसर पोलिसांकडून मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

दिलासा! पाच हजार कोरोनामुक्त 80 वर्षांहून अधिक वयाचे; भीती न बाळगण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

जुलै महिन्यात सुर्या नदीच्या बंधाऱ्यावर पोहोण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान सुर्या नदी पात्र बंधाऱ्याच्या भागात धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे सुर्या नदी पात्रात पोहोण्यासाठी येणाऱ्यांना मनाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Young man drowns in Surya river while doing stunts


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man drowns in Surya river while doing stunts

Tags
टॉपिकस