'त्या' तरुणाला मारहाणीचं प्रकरण पोलिसांना भोवलं; इतक्या जणांवर केली मोठी कारवाई

'त्या' तरुणाला मारहाणीचं प्रकरण पोलिसांना भोवलं; इतक्या जणांवर केली मोठी कारवाई


मुंबई ः कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यात देशात संचार बंदी लागू करण्यात आली होती. तरीही अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत. याच मारहाणीत आता एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आता हे प्रकरणं पोलिसांच्या अंगाशी आले असून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राजू देवेंद्र असे या मृत तरुणाचे नाव असून पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केला होता. या प्रकऱणात आता जुहू पोलिस ठाण्यातील पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याप्रकरणातील तक्रारीनुसार, विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात राजू हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. 3 मार्चला मध्यरात्री  1 वाजता राजू हा त्याच्या नातेवाईकांच्या घरी जात असताना पोलिसांनी त्याला पकडले व त्याला जुहू पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र तसे न करता पोलिसांनी सकाळी 6 वाजता रस्त्यातच अमानुष मारहाण केली. या मारहाणीत राजू गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले, मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. राजू हा पोलिसांच्या अमानुष मारहाणीचाच बळी पडाला असल्याचा आरोप त्याचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केला होता.

मात्र, पोलिसांनी मनिकम वेलू देवेंद्रचे आरोप चुकीचे असून राजू हा राञीच्या वेळेस दरोडा टाकण्यासाठी फिरत होता. त्याच्यावर  या पूर्वी ही गुन्ह्यांची नोंद आहे. मनिकम वेलू देवेंद्रने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र राजूला रुग्णालयात दाखल करतानाचा व्हिडिओ त्याच्या घरातल्यांनी काढला आहे. त्याच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचा आरोप कुटुंबियांना केला आहे. भावाची हत्या करणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजूचा भाऊ मनिकम वेलू देवेंद्रने केली होती. त्या नुसार या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीनंतर पोलिस नाईक संतोष  गणपतराव देसाई, आनंदा गायकवाड, दिगंबर चव्हाण, अंकुश पालवे या चौघांवर जुहू पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सेवेतून निलंबित केले आहे

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com