नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेला, पण मुलीने दरवाजाच उघडला नाही वाचा काय घडलं..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

अल्पवयीन मुलाविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
उल्हासनगर : मुलीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या मुलाला संबंधित मुलीने प्रतिसाद न देता घराचा दरवाजा बंद ठेवल्यामुळे त्याने मुलीला शिवीगाळ केली. त्यामुळे तिच्या शेजारच्या व्यक्तीने मुलाला मज्जाव केल्यामुळे चिडलेल्या मुलाने शेजाऱ्यावर चाकूहल्ला केल्याची घटना उल्हासनगर येथे घडली.

या हल्ल्यात मुलीच्या शेजारी राहणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी फरारी हल्लेखोर मुलावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. 

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 फॉरवर्ड लाईन परिसरात राहणारा 17 वर्षीय आरोपी मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी दोघेही एकमेकांच्या परिचयातले आहेत. आरोपी मुलगा मुलीला नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिच्या घरी होता. मात्र मुलीने दरवाजा बंद ठेवून प्रतिसादच दिला नाही .त्यामुळे त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वेळी मुलीच्या शेजारी राहणारे रवी पारचा यांनी मुलाला हटकल्यामुळे मुलाने रवी यांच्या पोटात चाकू खुपसून तेथून पळ काढला. 

ही बातमी वाचा ः कामावरुन काढन टाकल्याने तिने उचलले हे पाऊल
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवी पारचा यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना कळवा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी जखमी मुलाचा भाऊ राजेंद्र पारचा यांच्या तक्रारीवरून त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध मध्यवर्ती पोलिस ठाण्यात 307 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा फरारी झाला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्षनाथ वाघ त्याचा शोध घेत आहेत. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man who went to greet the girl checkered at the neighbor