आई-बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणीची खदाणीत उडी; डोंबिवलीजवळील हेदुटणे गावातील घटना

आई-बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात तरुणीची खदाणीत उडी; डोंबिवलीजवळील हेदुटणे गावातील घटना

डोंबिवली  : आई आणि बहीण खदाणीतील पाण्यात बुडत असल्याचे पाहत त्यांना वाचवण्यासाठी तरुणीनेही पाण्यात उडी घेतली. नंतर आई आणि लहान बहीण सुखरूप बाहेर आल्या; पण तरुणीला बाहेर येता आले नाही. डोंबिवलीजवळील हेदुटणे गावात रविवारी दुपारी ही घटना घडली असून तरुणीचा शोध अद्याप लागलेला नाही. 

डोंबिवलीजवळील हेदुटणे गावात राणी ढाब्याच्या पाठीमागे खदान आहे. या खदानीमध्ये गावात राहणाऱ्या गीता शेट्टी या मुलगी लावण्या (16) आणि परी (4) यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. आई कपडे धूत असताना मुली बाजूलाच खेळत होत्या. खेळताचा अचानक लहान मुलीचा पाय घसरला आणि परी पाण्यात पडली. परी पाण्यात पडल्याने पोहता येत नसूनही आई गीताने मुलीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आई आणि परीची पाण्याच्या बाहेर येण्याची धडपड पाहून लावण्यानेही त्यांना मदत करण्यासाठी पाण्यात उडी घेतली. आईने परीसह कसाबसा खदानीचा किनारा गाठला, परंतु याचदरम्यान लावण्या मात्र दिसेनाशी झाली. आईने तिला खूप हाका मारल्या, परंतु लावण्याचा शोध लागला नाही. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनीही खदानीच्या ठिकाणी धाव घेतली. मानपाडा पोलिस ठाणे व अग्निशमन दलास तातडीने याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने लावण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधार पडल्याने अग्निशमन दलाने शोधकार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा तरुणीचा शोध घेतला जाणार असल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवानांनी लावण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली; मात्र सहा तास उलटूनही शोध लागलेला नाही. सायंकाळी 6 वाजता शोधकार्य थांबवण्यात आले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेणार आहोत. 
- रवी गोवारी,
उपकेंद्र प्रमुख, अग्निशमन दल 

The young woman jumps into the mine in an attempt to save her mother and sister Incident at Hedutane village near Dombivali

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com