Kalyan Crime News : रस्ता विचारल्याच्या शुल्लक कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, कल्याण पूर्वेतील घटना, एकाला अटक
Public Safety : रस्त्यावर विचारलेल्या मार्गाच्या कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला. जखमी झालेल्या धीरज जावळेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली : रस्ता विचारल्याचे निमित्त झाले आणि या एका शुल्लक कारणावरून एका 25 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. धीरज जावळे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.