esakal | तरुणाईच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय युवा संघटनांंनी एकत्र यावे - वरुण सरदेसाई | varun sardesai
sakal

बोलून बातमी शोधा

varun sardesai

तरुणाईच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय युवा संघटनांंनी एकत्र यावे - वरुण सरदेसाई

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : आज तरूणाई अंमली पदार्थांच्या (Drugs) आहारी जात आहे. एनसीबीने (NCB) नुकतीच एका क्रुज वर कारवाई केली आहे. तरुणाईला अंमली पदार्थांचा (youth drug addiction) पडत असलेला विळखा पाहता तरुणांनीच यातून बोध घेतला पाहिजे. तरूणाई समोर केवळ अंमली पदार्थ नाही तर बेरोजगारी (unemployment) हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यासाठी सर्वपक्षीय युवा संघटनांनी एकत्र येत एक संवेदनशील मोहीम राबविण्याची गरज असल्याचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई (varun sardesai) यांनी सांगितले.

हेही वाचा: डोंबिवली बलात्कार प्रकरण; कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींना करणार हजर

कल्याण डोंबिवली दोन दिवस युवासेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानिमित्त युवासेना सचिव सरदेसाई हे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, दीपेश म्हात्रे, निखिल वाळेकर हे उपस्थित होते. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून एक युवकांची एक नवीन संघटना तयार करण्यात येईल असे वरुण यांनी सांगितले.

मुंबईहुन गोवा जाणाऱ्या क्रुजवरील रेव्ह पार्टी वर एनसीबीने छापा टाकला. तरुणाईला अंमली पदार्थाचा विळखा पडत आहे. याविषयी सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, ड्रग्स प्रकरणी तपास यंत्रणा आपले अधिकृत स्टेटमेंट देतीलच. मात्र तरुणांनी यातून बोध घेतला पाहिजे. तरूणाई समोर अंमली पदार्थ हा एकच विषय नाही तर बेरोजगारी देखील प्रश्न आहे. हे रोखण्यासाठी केवळ युवासेना नाही तर सर्वपक्षीय युवा संघटनांनी एकत्र येत संवेदनशील मोहीम राबविणे गरजेचे आहे असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.

loading image
go to top