Swaroop Aarekar
sakal
- संतोष घरत
बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रात कॅम्लिन नाका ते एमआयडीसी पोलीस ठाण्यादरम्यान शनिवारी (ता. २४) सायंकाळी ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. स्वरूप सागर आरेकर (वय २०, रा. दांडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. कामाची पाळी संपवून घरी परतत असताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.